शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आयटीआयच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:15 IST

अमरावती: राज्यासह जिल्ह्यातील शासकीय आणि खासगी आयटीआयमध्ये प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. व्यवसाय शिक्षण व ...

अमरावती: राज्यासह जिल्ह्यातील शासकीय आणि खासगी आयटीआयमध्ये प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने प्रवेशाचे वेळापत्रक नुकतेच संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. तसेच आयटीआय प्रवेश इच्छुक उमेदवारांसाठी प्रवेशाची सविस्तर माहिती पुस्तिका प्रवेश पद्धती नियमावली व प्रमाणित कार्यपद्धती संचालनालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे.

सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश सत्र २०२१-२२ करिता प्रवेश हे संबंधित मंडळांनी निर्गमित केलेल्या इयत्ता दहावीच्या गुणपत्रिकेतील गुणांच्या आधारे केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार असून उमेदवारांना प्रवेश निश्‍चितीसाठी आवश्यक कागदपत्रे प्राप्त करून घेण्यासाठी व प्रवेश अर्ज भरण्यासाठी पुरेसा कालावधी मिळावा याकरीता संचालनालयाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन प्रवेश अर्ज १५ जुलै पासून उपलब्ध करुन दिले आहेत. यावर्षी आयटीआय प्रवेश इच्छुक उमेदवारांना जिल्ह्यातील १८ शासकीय व १३ खाजगी आयटीआयमध्ये दोन्ही मिळून ६ हजार ४९६ जागा उपलब्ध असणार आहेत. आयटीआयमध्ये विविध प्रकारचे व्यवसाय अभ्यासक्रम उपलब्ध असून ८० अभ्यासक्रमासाठी इयत्ता दहावी उत्तीर्ण तर ११ अभ्यासक्रमासाठी इयत्ता दहावी उत्तीर्ण अनुउत्तीर्ण उमेदवार पात्र असणार आहेत.

बॉक्स

असे आहे प्रवेशाचे वेळापत्रक

ऑनलाईन प्रवेश अर्ज करणे १५ जुलै ते ३१ ऑगस्ट,पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थान या विकल्प प्राधान्य गट सादर करणे १५ जुलै ते ३१ ऑगस्ट,प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे-२ सप्टेंबर, गुणवत्ता यादी बाबत हरकती नोंदविणे व प्रवेश अर्जातील माहीतीत बदल करणे २ ते ३ सप्टेंबर,

अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे ४ सप्टेंबर

बॉक्स

फेरीनिहाय प्रवेशाची प्रक्रिया

पहिल्या प्रवेश फेरीसाठी संस्था व्यवसाय नियत निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे व उमेदवारांना एसएमएसव्दारे कळविणे ६ सप्टेंबर,पहिल्या फेरीनुसार प्रवेश निश्चित करणे प्रवेशाची प्रत्यक्ष कार्यवाही करणे ७ ते ११ सप्टेंबर,दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी ऑनलाईन पद्धतीने व्यवसाय संस्थानी या विकल्प व प्राधान्य सादर करणे ७ ते १२ सप्टेंबर,दुसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे १५ सप्टेंबर,दुसऱ्या यादीनुसार प्रवेश निश्चिती १६ ते २० सप्टेंबर,तिसऱ्या प्रवेश फेरी साठी ऑनलाईन पद्धतीने व्यवसाय व संस्थांनी या विकल्प व प्राधान्य सादर करणे १६ ते २१ सप्टेंबर,तिसरी गुणवत्ता यादी १४ सप्टेंबर,तिसऱ्या यादीनुसार प्रवेश निश्‍चिती २५ ते २८ सप्टेंबर,चौथ्या प्रवेश फेरीसाठी ऑनलाईन पद्धतीने व्यवसाय संस्था न्याय विकल्प व प्राधान्य सादर करणे २५ ते २९ सप्टेंबर,चौथी गुणवत्ता यादी ३ ऑक्टोंबर,चौथ्या यादीनुसार प्रवेश निश्‍चिती ४ ते ७ आक्टोंबर