शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

आयटीआयला गर्दी मावेना अन पॉलिटेक्निकला विद्यार्थी सापडेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 17:55 IST

अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमानंतर आता तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) पदविका अभ्यासक्रमाच्या संस्था प्रवेशाअभावी ओस पडू लागल्या आहेत.

ठळक मुद्देदहावीनंतर विद्यार्थ्यांचा कलतंत्रनिकेतनला उतरती कळा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमानंतर आता तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) पदविका अभ्यासक्रमाच्या संस्था प्रवेशाअभावी ओस पडू लागल्या आहेत. दुसरीकडे आयटीआयला प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना वेटिंग लिस्टचा सामना करावा आहे. आतापर्यंत चार फेऱ्यांमध्ये सुमारे ८० हजार विद्यार्थ्यांनी आयटीआयत प्रवेश घेतला. आयटीआयला गर्दी मावेना अन पॉलिटेक्निकला विद्यार्थी सापडेना, असे विदारक चित्र आहे.इयत्ता दहावीचा निकाल जाहीर होताच विद्यार्थी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण (आयटीआय) किंवा तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) प्रवेशाला पसंती देतात. एकाच वेळी प्रवेशाचीे प्रक्रिया सुरू होत असल्याने विद्यार्थी दोन्ही ठिकाणी अर्ज करीत असले तरी आयटीआयला पसंती दिल्याचे दिसून आले. राज्यात पॉलिटेक्निकमध्ये १ लाख ३० हजार ८०० जागांसाठी प्रवेश होते. त्यासाठी निम्म्याहून कमी म्हणजे ५७ हजार ९९७ जागांसाठी अर्ज तंत्र शिक्षण विभागाकडे आले. आयटीआय अभ्यासक्रमाच्या १ लाख ३८ हजार ३१७ जागांच्या प्रवेशासाठी तब्बल ३ लाख ९५ हजार १७४ विद्यार्थ्यांनी अर्ज केले. चार फेºयांच्या अखेरीस सुमारे ८० हजार प्रवेश निश्चित झाले आहेत.तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रमातून रोजगाराची संधी मिळण्याची आशा मावळल्याने या संस्थांना उतरती कळा लागली आहे. अनुदानित महाविद्यालयांमध्ये जागा शिल्लक राहण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. गत तीन वर्षांपासून खासगी आणि अनुदानित संस्थांच्या प्रवेशाची गर्दी ओसरली आहे. दहावी निकालाची टक्केवारी वाढली असली तरी पॉलिटेक्निकऐवजी आयटीआय प्रवेशाला विद्यार्थी प्राधान्य देत असल्याचे वास्तव आहे.अमरावतीत आयटीआयमध्ये १४ हजार ८११ प्रवेशअमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये सन २०१८-१९ या शैक्षणिक सत्रात १४ हजार ८११ विद्यार्थ्यांना आयटीआयमध्ये प्रवेश देण्यात आला. यात अमरावती ४२३९, अकोला २९०९, वाशिम ११६५ यवतमाळ ३६७८, तर बुलडाणा जिल्ह्यात ३०५९ प्रवेश झाले आहेत. विभागात शासकीय ६३ आणि १६ खासगी आयटीआय आहेत.गेल्या चार ते पाच वर्षांपासून आयटीआय प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण करून बाहेर पडणारा विद्यार्थी हमखास रोजगार मिळवितो, हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे प्रवेशासाठी दरवर्षी गर्दी वाढतच आहे.- पी.टी. देवतळे, सहसंचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय अमरावती.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र