शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

-तर ‘ती’ ठरली असती अत्याचाराची बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 22:19 IST

आॅनलाईन लोकमतअमरावती : नवऱ्याच्या शोधात इर्विन पालथे घातल्यानंतर तिने रात्री पोलीस चौकीसमोरील आडोशाला विसावा घेतला. तेवढ्यात दबा धरून बसलेल्या नराधमाने तिच्या कुशीतून अडीच वर्षीय चिमुकलीला पळविले. तिचा आकांत पाहून तेथील नागरिकांनी शोधासाठी तत्परता दाखविली. लगतच्या एका अंधाऱ्या गल्लीत ‘तो’ चिमुकलीसोबत आढळून आला. त्याला वेळीच पकडले नसते, तर ती चिमुकली लैंगिक अत्याचाराची ...

ठळक मुद्देइर्विनमधील घटना : अपहृत चिमुकली सापडली

आॅनलाईन लोकमतअमरावती : नवऱ्याच्या शोधात इर्विन पालथे घातल्यानंतर तिने रात्री पोलीस चौकीसमोरील आडोशाला विसावा घेतला. तेवढ्यात दबा धरून बसलेल्या नराधमाने तिच्या कुशीतून अडीच वर्षीय चिमुकलीला पळविले. तिचा आकांत पाहून तेथील नागरिकांनी शोधासाठी तत्परता दाखविली. लगतच्या एका अंधाऱ्या गल्लीत ‘तो’ चिमुकलीसोबत आढळून आला. त्याला वेळीच पकडले नसते, तर ती चिमुकली लैंगिक अत्याचाराची बळी ठरली असती.इर्विन रुग्णालयात शुक्रवारी मध्यरात्रीनंतर हा प्रकार घडला. उमेश ऊर्फ हड्डी शंकर धुमाळे (३०, रा. समाधाननगर) असे कोतवाली पोलिसांच्या स्वाधीन केलेल्या आरोपीचे नाव आहे. शिरजगाव कसबा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सायखेडा येथील ही महिला शुक्रवारी पतीच्या शोधात जिल्हा सामान्य रुग्णालयात आली होती. तिने रुग्णालयात पतीचा शोध घेतला. मात्र, तो दिसला नाही. रात्र झाल्याने ती इर्विन रुग्णालयातील पोलीस चौकीसमोर तिच्या दोन मुलांना सोबत घेऊन झोपली. मध्यरात्री १२.३० वाजता उमेश तेथे आला आणि महिलेजवळील अडीच वर्षीय मुलीला घेऊन पसार झाला. महिलेला जाग आला तेव्हा तिला धक्काच बसला. तिने आरडाओरड व रडारड सुरू केली. उपस्थित नागरिकांनी इर्विन चौकीतील पोलिसांना माहिती देऊन मुलीचा शोध घेतला. चौकातील एका अंधाऱ्या गल्लीत उमेश हा मुलीसोबत आढळून आला. नागरिकांनी त्याला पकडून कोतवाली पोलिसांच्या स्वाधीन केले. उमेश हा गुंड प्रवृत्तीचा असून, विविध ठाण्यांमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणात पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ३६३, ५११ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.इर्विन टवाळखोरांचा अड्डाइर्विन रुग्णालय परिसरात मद्यपी, भिकारी व चोरांचा सुळसुळाट झाला आहे. पोलीस चौकी असतानाही त्या ठिकाणी टवाळखोरांचा वावर असतो. काही दिवसांपूर्वी ठाणेदार दिलीप पाटील यांनी अशा टवाळखोरांवर कारवाईचा बडगा उगारला होता.