शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

महिलांचाच पुढाकार ठरणार महत्त्वाचा

By admin | Updated: May 30, 2017 00:18 IST

कोकर्डा येथील देशी दारू दुकान बंद करण्यासाठी महिलांचा पुढकार महत्त्वाचा असल्याने आजूबाजूच्या गावांतील महिला कोकर्ड्याच्या महिलांची समजूत घालत आहेत.

पत्रके वाटून प्रचार : याआधीही झाले होते दारू दुकान बंद लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी : कोकर्डा येथील देशी दारू दुकान बंद करण्यासाठी महिलांचा पुढकार महत्त्वाचा असल्याने आजूबाजूच्या गावांतील महिला कोकर्ड्याच्या महिलांची समजूत घालत आहेत. दारू दुकान बंद करायचे असेल तर महिलांनी एकत्र यावे, यासाठी जागर केला जात आहे. कोकर्डा येथील दारू दुकान बंद करण्यात यावे, यासाठी शेंडगाव, खासपूर येथील महिलांनी आंदोलन सुरू केले होते. आंदोलनाच्या तीव्रतेमुळे प्रशासनाला दारू दुकानाला सील ठोकावे लागले. सध्या हे दारू दुकान बंद आहे. दुकान सुरू राहावे किंवा नाही यासाठी ३ जून रोजी मतदान घेण्यात येणार आहे. यासाठी विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली आहे. शेंडगाव ते खासपूरच्या महिलांना ग्रामसभेमध्ये उपस्थित राहण्याचा अधिकार नसल्याने त्यांनी कोकर्डा गावामध्ये घरोघरी जाऊन महिलांना भेटून दारुपासून काय नुकसान होते याची माहिती देणारे पत्रक वाटत आहेत. कोकर्डा गावातील देशी दारू दुकान महिलाच हटवू शकता, असे समजूत घालत आहे. महिलांची उपस्थितीत विशेष ग्रामसभेत दारू दुकान बंद करण्याचा ठराव घेतला जाईल. यामुळे त्यांची उपस्थिती गरजेची आहे. महिलांची ५० टक्के उपस्थिती आवश्यकमहाराष्ट्र शासनाने अधिनियमान्वये तयार केलेले राजपत्रानुसार दारू दुकान बंद होण्यासाठी रीतसर प्रक्रिया आवश्यक असल्याने या विषयासाठी ३ जूनला बोलावण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेला महिलांची ५० टक्क्यांवर उपस्थिती आवश्यक आहे. विशेष बाब म्हणजे आंदोलनस्थळी शेंडगाव, खासपूर या गावच्या महिलांची संख्या जास्त होती, तर कोकर्डा गावातील बोटावर मोजण्या इतक्याच महिला आंदोलनस्थळी उपस्थित होत्या. राजकीय दबावाचा प्रयत्न कोकर्डा गावातील झेंडा चौकामध्ये असलेले देशी दारु दुकान शांतता व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून दि. ३१-१-२००१ ला बंद करून १-२-२००१ पासून पुन्हा सुरू करण्यात आले होते. त्यावेळी सुद्धा अश्याच प्रकारचे आंदोलन करण्यात आले होते. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता कोकर्डा ग्रामपंचायतीच्या ११ सदस्यांपैकी ९ सदस्य हे एका विशिष्ट गटाचे असल्याने गावातील महिला किती प्रमाणात उपस्थितीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.