शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

हे तर नरबळीच्या गुन्ह्यांना बळच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2016 00:11 IST

प्रथमेश सगणे आणि अजय वणवे या निरागस मुलांच्या नरबळीचा प्रयत्न शंकर महाराज यांच्या आश्रमात झाला.

सीआयडी चौकशीची घोषणा का नाही ?निष्ठुरता : फडणवीस शासन बुवाबाजीच्या पाठीशी ?अमरावती : प्रथमेश सगणे आणि अजय वणवे या निरागस मुलांच्या नरबळीचा प्रयत्न शंकर महाराज यांच्या आश्रमात झाला. त्याशिवाय आणखी एका संशयास्पद मृत्यूचे प्रकरण 'लोकमत'ने लोकदरबारात मांडले; परंतु पुरोगामी विचारांचे म्हणविणारे महाराष्ट्र शासन आश्रमातील गुन्हे निखंदून काढण्यासाठी सीआयडी चौकशीची घोषणा करीत नसल्याने, हे सरकार बुवाबाजीला समर्थन तर देत नाही ना, अशी व्यापक चर्चा आता सुरू झाली आहे. अनुदानित शाळा, वसतिगृहाचा भरणा असलेल्या शंकर महाराज यांच्या आश्रमात एक नव्हे, चक्क दोन विद्यार्थ्यांचा नरबळी देण्याचा प्रयत्न होतो. आश्रमाने लपविलेले हे सत्य 'लोकमत'च्या शोधमोहिमेमुळे जगासमोर येते. मात्र शासन हाणामारीच्या गुन्ह्याकडे बघावे, तशा नजरेने या मुद्याकडे बघत राहते. जगभरातून अद्ययावत तंत्रज्ञान आणि क्रांतिकारी विज्ञान वेचून राज्य प्रगत करण्यासाठी झपाटलेल्या मुख्यमंत्र्यांच्या राज्यात आजही सामर्थ्यप्राप्तीसाठी 'नरबळी' घेणारे लोक कुठल्याही धाकाविना कार्यरत आहेत. देंवेंद्र फडणवीस यांच्या राज्यात माणसांची लेकरे कापून शक्ती मिळविणारे लोक आणि त्यांच्याभोवतीचे संशयित वर्तूळ कुठलाही मुलाहिजा न करता भेदले जावेत, यासाठी प्रभावी उपाय योजले जात नाहीत.माझ्या पुरोगामी महाराष्ट्रात कुणाची निरागस मुले अघोरी सामार्थ्यप्राप्तीसाठी कापली, ठेचली जातातच कशी, हा विचार राज्यकर्ते असलेल्या मुख्यमंत्र्यांना का बोचला नसेल? मुख्यमंत्री ज्या-ज्या विकसित राज्यात, देशात जाऊन आलेत, त्या-त्या प्रगत राज्यात शक्तीप्राप्तीसाठी कुण्या विद्यार्थ्यांचा गळा कापला असता, चेहरा ठेचला असता तर तेथील शासन इतक्याच थंडपणे वागले असते काय? ही तुलना करण्याचे कारण असे की, जगातील ज्या प्रगत राज्यांचा आदर्श आम्ही घेत आहोत, त्या राज्यात माणसांच्या मुलांप्रती बाळगली जाणारी संवेदनशीलताही आम्ही स्वीकारायलाच हवी. हे राज्य प्रगत करण्यामागे भविष्यातील या पिढ्यांचाच तर विचार दडलाय ना ! वाघांसाठी, गोमातेसाठी शासनाने पूर्ण शक्ती पणाला लावलेली बघताना ऊर अभिमानाने भरून येतो. बोकड्यांची कत्तल असो वा श्वानांच्या नसबंदीचा मुद्दा- हे शासन पशुंचीही चिंता वाहणारे आहे, हे निर्विवादपणे स्पष्ट होते. फडणवीस हे अलीकडेच अमरावती जिल्ह्यातील गोशाळेच्या उद््घाटनाला येऊन गेलेत, त्यावेळी मंत्रिमंडळाच्या या प्रमुखाची जीवांप्रतीची आत्मियता झळकली. प्राण्यांसाठीही इतके संवेदनशील असलेले मुख्यमंत्री माणसांची निरागस मुले त्यांच्या लगतच्याच जिल्ह्यात बळी चढविण्याचा प्रयत्न केला जात असताना गप्प का? विहिरीला असावे तसे अनेक भूमिगत झरे या प्रकरणातही असण्याची दाट शक्यता आहे. सीआयडी मागणीसाठी अवघा जिल्हा विद्रोह करून उठला. मुख्यमंत्र्यांनाही लोक भेटलेत; परंतु ना फडणवीसांचे हृदय द्रवले; ना त्यांच्यातील शासक अस्वस्थ झाला. राज्यकर्ता म्हणून मनुष्यबळी रोखण्यासाठी वापरता येणारे अधिकार टाळून राज्यातील लोकांच्या कल्याणासाठी विघ्नहर्त्याला साकडे घालणे, खरेच किती उपयोगाचे?