लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दहा क्विंटल गांज्या घेऊन जाणाऱ्या त्या ट्रकमध्ये जीपीएस प्रणाली कार्यान्वित असल्याने लोणी पोलिसांना पकडण्यात यश आले. लोणी पोलिसांच्या चौकशीअंती या ट्रॅकचे कोणतेच कागदपत्र आढले नाही, हे विशेष. त्यामुळे सुगावा लावण्याकरिता गुन्हे शाखेची दोन पथके रवाना झाली आहे.२५ जूनच्या रात्री नाकाबंदी दरम्यान साई रिसॉर्टजवळ संशयित ट्रकला थांबवून चौकशी केली असता, केळीच्या घडाखाली दहा क्विंटल गांज्याचे २० ते २२ कट्टे आढळून आले. परंतु तेथून दोन आरोपी पसार झाले. एकाला वाहनाची कागदपत्रे मागितली असता, त्याला काहीच माहिती नसल्याचे उत्तर मिळाले. ट्रकमधील इतर साहित्याचीही पाहणी केली. परंतु काहीच मिळाले नाही. परंतु आंध्रप्रदेश ते जळगाव अशा प्रवासाचा केळी वाहतूक परवाना आढळून आला. तसेच ट्रकमालकाला २५ जूनपासून लोणी पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेने संपर्क करून हजर राहण्यास सांगितले. मात्र, अद्याप ट्रकमालक हजर झालेला नाही.२त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पथक आंध्र प्रदेश व जळगाव जिल्ह्यात त्यांच्या शोधार्थ रवाना करण्यात आले आहे. लोणी पोलिसांनी पकडलेल्या गांज्याच्या गुन्ह्यातील आरोपी पकडण्यास व तपासाची सूत्रे स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे.केळी नष्ट करण्याचे आदेशट्रकमधील केळीच्या खाली गांजाचे कट्टे सापडल्यामुळे चार दिवसांपासून लोणी पोलीस ठाण्यात सदर ट्रक जमा आहे. त्यामुळे ट्रकमधील केळीचे घड सडू लागल्यामुळे अमरावती न्यायालयाने सदर केळी तात्काळ नष्ट करण्याचे आदेश दिले आहे.केळी नाशवंत खाद्य असल्याने त्यापासून रोगराईची शक्यता पाहता न्यायालयाने ती नष्ट करण्याचा निर्णय दिला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू आहे.- एस. एस. अहिरकर, ठाणेदार, लोणी पोलीस ठाणे
‘तो’ ट्रक सापडला जीपीएस प्रणालीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 22:53 IST
दहा क्विंटल गांज्या घेऊन जाणाऱ्या त्या ट्रकमध्ये जीपीएस प्रणाली कार्यान्वित असल्याने लोणी पोलिसांना पकडण्यात यश आले. लोणी पोलिसांच्या चौकशीअंती या ट्रॅकचे कोणतेच कागदपत्र आढले नाही, हे विशेष. त्यामुळे सुगावा लावण्याकरिता गुन्हे शाखेची दोन पथके रवाना झाली आहे.
‘तो’ ट्रक सापडला जीपीएस प्रणालीने
ठळक मुद्देदोन पथके रवाना : ट्रकचे कागदपत्र नाहीत