शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेत आयटी सेल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 23:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आठ लाख अमरावतीकरांचे प्रतिनिधित्व करणाºया महापालिकेत आयटी (इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी) सेलची उभारणी होणार आहे. संगणकीकरणाच्या या युगात प्रत्येक घटकांचे डिजिटायजेशन होत असताना महापालिकेत आयटी सेल असावा, असा मानस महापौर संजय नरवणे यांनी व्यक्त केला. त्या अनुषंगाने संगणक विभागप्रमुख अमित डेंगरे व त्यांची यंत्रणा कामाला लागले आहे.महापालिकेत आरोग्य, ...

ठळक मुद्देमहापौरांचा पुढाकार : प्रशासन सकारात्मक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आठ लाख अमरावतीकरांचे प्रतिनिधित्व करणाºया महापालिकेत आयटी (इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी) सेलची उभारणी होणार आहे. संगणकीकरणाच्या या युगात प्रत्येक घटकांचे डिजिटायजेशन होत असताना महापालिकेत आयटी सेल असावा, असा मानस महापौर संजय नरवणे यांनी व्यक्त केला. त्या अनुषंगाने संगणक विभागप्रमुख अमित डेंगरे व त्यांची यंत्रणा कामाला लागले आहे.महापालिकेत आरोग्य, स्वच्छता, बांधकाम, नगररचना, सामान्य प्रशासन, विद्युत अशा महत्त्वपूर्ण विभागांमध्ये नानाविध कामे ‘अ‍ॅप’वरून केली जातात. त्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा काम करते; मात्र संगणक विभागाकडेच या सर्व बाबींची जबाबदारी असल्याने त्यांना मर्यादा येतात. त्या दृष्टिकोनातून महापालिकेत आधुनिक तंत्रज्ञानयुक्त असा आयटी सेल कार्यान्वित केला जाणार आहे. माहिती-तंत्रज्ञान संदर्भातील प्रत्येक बाब आयटी सेलच्या माध्यमातून चुटकीसरशी सोडविली जाईल. याशिवाय आॅटो-डीसीआर प्रणाली अधिक पारदर्शक करण्यासाठी तो डेटा मालमत्ताकरांशी जोडणे शक्य आहे का, याची चाचपणी केली जात आहे. आॅटो-डीसीआर प्रणालीमध्ये संबंधित मालमत्ताधारकाचा व बांधकाम जेथे करत आहे, तो पत्ता अनिवार्य करण्याच्या सूचनाही महापौरांनी दिल्या आहेत. आपले सरकार, पीजी पोर्टल, एसएमएसद्वारे आलेल्या तक्रारींची नोंद घेऊन त्या त्वरित सोडविण्यावर भर दिला जाणार आहे. लेखी तक्रारींची नोंदही आयटी सेलमध्ये करण्यात येणार आहे. महापालिकेतील अनेक प्रकल्पांचे डीपीआर बनविण्यासाठी अन्य कंपनी वा एजन्सीची मदत घेतली जाते. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, स्मार्ट सिटी प्रकल्प या दोन प्रकल्पांव्यतिरिक्त स्टॉर्म वॉटर मॅनेजमेंट प्रकल्पाचा डीपीआर बनविला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर नव्याने उभारण्यात येणारा आयटी सेल महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. या सेलमध्ये सिस्टीम मॅनेजर डेंगरे यांच्यासह संगणक अभियंत्यांचा समावेश राहणार आहे. महापालिकेतील अनेक विभागांचे डिजिटायजेशन करण्यात आल्याने या आयटी सेलच्या जबाबदारीत शतपटीने वाढ होणार आहे.महापौरांच्या सूचनास्वच्छता कामगारांची बायोमेट्रिक हजेरी घ्यावी, हजेरी ठिकाणी सीसीटीव्ही लावावेत, ते मनपा पदाधिकारी व अधिकाºयांच्या मोबाइलशी जोडावे, शहर बसमध्ये जीपीएस प्रणाली लावावी, शिवाय स्वच्छता अ‍ॅपवरील आलेल्या तक्रारींचा त्वरित निपटारा करण्याचे निर्देश महापौरांनी महापालिका अधिकाºयांना दिले आहेत.