शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

धनगर आरक्षणाचा मुद्दाही ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 22:23 IST

धनगर समाजानेही आरक्षणाच्या मागणीसाठी शक्ती एकवटली आहे. धनगर समाजास अनुसूचित जमाती (एस.टी) आरक्षण मिळावे, यासाठी महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघ प्रणित मल्हार सेनेच्या वतीने पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांच्या पुण्यातिथीनिमित्त १३ आॅगस्ट रोजी जिल्हाकचेरीसमोर धरणे देण्यात आले.

ठळक मुद्देआंदोलन : जिल्हा कचेरीसमोर धनगर समाज महासंघाचे धरणे

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : धनगर समाजानेही आरक्षणाच्या मागणीसाठी शक्ती एकवटली आहे. धनगर समाजास अनुसूचित जमाती (एस.टी) आरक्षण मिळावे, यासाठी महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघ प्रणित मल्हार सेनेच्या वतीने पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांच्या पुण्यातिथीनिमित्त १३ आॅगस्ट रोजी जिल्हाकचेरीसमोर धरणे देण्यात आले.धनगर समाजास अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या सवलती द्याव्यात याकरिता समस्त धनगर समाजाचा शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. विविध आंदोलनाच्या माध्यमातून सातत्याने शासनाकडे मागणी लावून धरण्यात आली आहे. मात्र, शासनाने याबाबत सकारात्मक भूमिका घेतलेली नाही. वास्तविक देशाच्या सर्वोच्च घटनेने धनगर समाजाचा उल्लेख घटनेच्या परिशिष्ट दोनमध्ये अनुसूचित जमातीच्या यादीत अनुक्रमांक ३६ नुसार केल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे धनगर समाजास आरक्षणाच्या सोयी सवलती मिळणे आवश्यक आहे. परंतु राज्य शासनाने यासंदर्भात कुठलीच कार्यवाही केलेली नाही. अनुसूचित जमातीच्या सवलती मिळत नसल्याने धनगर समाज मूलभूत हक्कापासून वंचित राहिला. न्याय्य मागण्यांसाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. भाजप सरकारने सत्तेवर येताच धनगर समाजास आरक्षणाच्या सवलती लागू करू व मेंढपाळांचे प्रश्न सोडवू असे आश्वासन दिले होते. मात्र सत्तेवर येऊन जवळपास चार वर्षे लोटली, तरीही आरक्षणासंदर्भात कार्यवाही केली नाही. त्यामुळे धनगर समाजात तीव्र नाराजी आहे. सोमवारी धनगर समाज महासंघाने धरणे आंदोलनाव्दारे शासनाचे मागणीकडे लक्ष वेधले. यावेळी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी ज्यांनी बलिदान दिले, असे परमेश्र्वर घोंगडे व सतीश होळकर आणि योगेश कारके आदी हुतात्म्यांना श्रद्धांजली देण्यात आली. आंदोलनात वसंत लवणकर, दिलीप एडतकर, उमेश घुरडे, सुरेश उंद्रे, राजेंद्र म्हस्के, ज्ञानेश्र्वर ढोमणे, सचिन कोल्हे, कै लास निंघोट, लक्ष्मण उघडे, मनीष तुपटकर, स्वप्निल साव, सुनील लव्हाळे, रंगराव शिंदे, लिबाजी माने, छबू मातकर, सुनंदा पाठक, नंदा लवणकर, मिना घुरडे,अस्मिता ढोमणे, छाया औघड, अर्चना टेकाडे, संगिता गोरडे, वर्षा नवरंगे, कोकीळा घुरडे, वर्षा मोहोड, वासुदेव पाठक, रंगराव बिचूकले, शालीक थोरात, महेश तायडे, गजानन गावडे, जनार्धन नवरंगे, किशोर नवले, बाबूलाल नवले, बनकर, राजेश शेंद्रे आदी सहभागी झाले होते.रास्ता रोको करून अहल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी साजरीअमरावती : राज्याचे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आस्वासनाची पुर्तता तत्काळ करण्यासाठी धनगर समाज संघर्ष समितीद्वारा सोमवारी येथील रहाटगाव चौकात राष्ट्रीय महामार्गावर महामार्गवर रस्ता रोको करण्यात आला व याच ठिकाणी पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यमंत्री महादेव जानकर व खा. विकास महात्मे यांच्या समवेत १० आॅगष्टला सह्याद्री अतिथीगृहावर चर्चा करण्यात आली. यावेळी धनगर समाजाला अनूसुचित जमातीचे आरक्षण देण्याविषयी संवाद झाला. मेंढ्यांना उपलब्ध वनजमिनीवर चराईक्षेत्र करण्याबाबत तत्काळ अध्यादेश काढण्यासाठी सबंधित सचिवांना आदेशीत केले. सोलापूर विद्यापीठाला ‘पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर विद्यापीठ’ असे नामांतर करण्याविषयी ठोस आस्वासन दिले. शेळ्या मेंढ्यांची निर्यात सुरू करण्याबाबत तातडीने निर्णय घेण्याविषयीचे आस्वासन दिले व राष्ट्रीय शेफर्ड कमिशन नेमन्याविषयी सचिवांना सांगीतले. शासनाने आस्वासन दिले असले तरी या निर्णयाची त्वरीत अंमलबजावणी व्हावी, यासाठी सोमवारी रस्ता रोको करण्यात आला. यावेळी संतोष महात्मे, मेघश्याम करडे, जानराव कोकरे, शंकरराव भदे, प्रकाशराव बोबडे, तुकाराम यमकर, हरिभाऊ शिंदे, शरद शिंदे, पंकज गोहत्रे, विलास अघडते, अरविंद पावडे, मनोज माहुलकर, दिकल गावनेर, दिपक गोहत्रे, दिनेश ढोक, साहेबराव भागवत, आदी उपस्थित होते.तासभर रस्ता रोको, वाहतूक ठप्पधनगर समाज संघर्ष समितीद्वारा महामार्गवर तासभर रस्ता रोको करण्यात आला. यामुळे महामार्गाच्या दुतर्फा शेकडो वाहनांची रांग लागली होती. यादरम्यान एक रुग्णवाहिका आली असता, आंदोलनकर्त्यांनी क्षणभरात रस्ता मोकळा केला. या आंदोलनात कुठलाही अनुचित प्रकार न घडता शांततेच्या मार्गाने आंदोलन पार पडले.