शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा पुरवठा विभागाला ‘आयएसओ’ मानांकन; विविध मानकांची केली आहे पूर्तता

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: May 4, 2024 00:27 IST

विविध प्रकारच्या ६० निकषांची पूर्तता झाल्याने या विभागाला आता ‘आयएसओ’ मानांकन प्राप्त झाले. अशा पद्धतीचे मानांकन मिळविणारे डीएसओ कार्यालय हा जिल्हाधिकारी कार्यालयातील पहिलाच विभाग ठरला आहे.

अमरावती : शासकीय कार्यालयात काम म्हटले सामान्य नागरिकांच्या माथ्यावर आठ्या पडतात. हा सूर मात्र, जिल्हा पुरवठा विभागात आता बदलल्याचे दिसून येत आहे. विविध प्रकारच्या ६० निकषांची पूर्तता झाल्याने या विभागाला आता ‘आयएसओ’ मानांकन प्राप्त झाले. अशा पद्धतीचे मानांकन मिळविणारे डीएसओ कार्यालय हा जिल्हाधिकारी कार्यालयातील पहिलाच विभाग ठरला आहे.

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या मार्गदर्शनात अधिकारी-कर्मचारी यांच्या कामाच्या दर्जामध्ये वाढ करण्यासाठी व कामांचे प्रमाणीकरण, प्रशासनात अधिक पारदर्शकता, लोकाभिमुखता व संवेदनशीलता आणणे, यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे यांच्याद्वारा ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे. प्रशासकीय कामकाज कार्यक्षम व्हावे आणि त्यांच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यासाठी आयएसओ प्रमाणीकरण करण्यात येते. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत पुरवठा विभागात एक मानांकित गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली तयार करण्यात आली व त्याद्वारे जिल्हा पुरवठा कार्यालयाचे आयएसओ प्रमाणीकरण करण्यात आलेले आहे.

कार्यालयाशी निगडित सर्व कामे वेळेत पूर्ण करणे, विभागाशी संबंधित सर्व कार्यालये व संबंधित संस्थांना लोकाभिमुख सेवा देताना सकारात्मक भूमिका राहणे, कार्यपद्धतीत पारदर्शकता ठेवणे यासह मुद्दे मानांकनासाठी महत्त्वपूर्ण आहेत.

१० विषयाअंतर्गत ६० निकष पूर्णआयएसओ मानांकनासाठी १० विषयाअंतर्गत ६० निकष देण्यात आलेले आहे. हे सर्व क्लिष्ट निकष जिल्हा पुरवठा विभागाद्वारा पूर्ण करण्यात आलेले आहेत. यामध्ये संसाधन गरजा, दस्तावेज व अभिलेख, नोटीस बोर्ट, सिटीजन चार्टर बोर्ड, संगणक प्रणाली, ग्राहक अभिप्राय व उपलब्ध सेवांचे मूल्यमापन, गुणवत्ता प्रणाली, सुरक्षा, प्रशिक्षण व इतर असे विषयांच्या अनुषंगाने निकषाची पूर्तता करण्यात आली.

जिल्हा प्रशासनाअंतर्गत पुरवठा विभागाला ‘आयएसओ’ मानांकन मिळणे हे मोठे यश आहे. इतर विभागालादेखील यामुळे प्रोत्साहन मिळेल व यासाठी प्रयत्न केल्या जातील. याद्वारे प्रशासकीय कामकाजामध्ये मोठी सुधारणा होईल.- सौरभ कटियार, जिल्हाधिकारी 

टॅग्स :Amravatiअमरावती