लोकमत न्यूज नेटवर्क / नरेंद्र जावरेपरतवाडा : उन्हाळ्यात टरबूज, संत्री, द्राक्ष ही फळे रसाळ फळांची मागणी वाढते. अनेकदा विक्रेते टरबूज कापून ठेवतात, ते लाल दिसल्याने ग्राहक आकर्षित होतो. मात्र, बऱ्याचदा अशा टरबुजांत रसायनांचा (केमिकल्स) चा वापर झाला असतो.
रसायन वापरलेले टरबूज कसे ओळखाल ?टरबूज रसायन टाकून की नैसर्गिकरीत्या पिकविले हे समजत नाही. याद्वारे पिकविलेल्या टरबुजाचा देठ हिरवाच असतो.
लाल रंगाला भुलू नका!कच्चे टरबूज रसायन वापरून लाल केले जाते आणि ते विकले जाते.
२० रुपये प्रतिकिलो विक्री दर आहेत; भाव उतरणारटरबुजाचे दर सध्या २० ते २५ रुपये किलो आहेत. अजून फारशी आवक झालेली नाही. मात्र, पंधरा दिवसांत मोठ्या प्रमाणात आवक होऊ शकते, तेव्हा भाव अजून थोडे उतरतील, असे विक्रेत्यांनी सांगितले.
एकही कारवाई नाहीरसायनयुक्त टरबूज कसे ओळखावे, अशा विक्रेत्यांवर कारवाई कोणी करावी, यासंदर्भात यंत्रणेतच गोंधळ आहे. एफडीए कडून एकही कारवाई केली नाही.
इंजेक्शनने रंगवतात टरबूजतज्ज्ञांच्या मते, टरबूज तोडल्यानंतर ते बाजारात आणण्यापूर्वी टरबुजात इंजेक्शन सोडल्याने टरबूज लाल दिसते.
पिवळ्या रंगाचे टरबूज; ही तर मोठी कमाल !अनेक शेतकरी शेतात वेगवेगळे प्रयोग करतात. आता पिवळ्या रंगाच्या टरबुजांची लागवड होऊ लागली आहे. हे टरबूज खायला लाल रंगाच्या टरबुजापेक्षाही गोड व रुचकर असते
बिया कोवळ्या निघाल्यास होऊ शकते फसगतकच्चे टरबूज रसायन वापरून लाल केले जाते. ते विकले जाते. कापल्यानंतर त्याच्या बिया कोवळ्या निघतात, याचा अर्थ हे टरबूज नैसर्गिकरीत्या पिकलेले नाही. ते आरोग्यासाठी हानिकारक आहे. अशा टरबुजाबाबत लोकांमधून तक्रारी येऊ लागल्या आहेत.
"टरबुजात रसायनांचा वापर हा आरोग्यासाठी ते घातक असते. याकरीता खबरदारी गरजेची आहे."- डॉ. प्रतिक्षा पोकळ