शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

‘इर्विन’चे आरोग्य बिघडले एकाच बेडवर दोन-तीन रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2022 05:00 IST

इर्विन रुग्णालयात रोज शेकडो विविध आजाराने ग्रासलेले तसेच अपघातग्रस्त रुग्ण हे उपचारासाठी येत असतात. परंतु, उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत रुग्णालयातील सोयी-सुविधा या अपुऱ्या पडत आहेत. मनुष्यबळ कमी असल्याने रुग्णांची चांगलीच गैरसोय होत असल्याचे चित्र रुग्णालयात पाहायला मिळत आहे. शनिवारी रुग्णालयातील ओपीडीमध्ये रुग्णांची संख्या अचानक वाढल्याने एका बेडवर दोन रुग्ण ठेवण्याची वेळ रुग्णालय प्रशासनावर आली होती.

उज्ज्वल भालेकर लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) येथील ओपीडीमध्ये बेडची संख्या कमी असल्याने बेडसाठी रुग्णांच्या नातेवाइकांची चांगलीच धावपळ झाली. शनिवारी रुग्णालयात  एका बेडवर दोन रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे चित्र पहायला मिळाले. तसेच ओपीडीमध्ये डॉक्टर राहत नसल्याने वेळेत उपचार मिळत नसल्याची ओरडही यावेळी काही रुग्णांच्या नातेवाइकांकडून करण्यात आली. इर्विन रुग्णालयात रोज शेकडो विविध आजाराने ग्रासलेले तसेच अपघातग्रस्त रुग्ण हे उपचारासाठी येत असतात. परंतु, उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत रुग्णालयातील सोयी-सुविधा या अपुऱ्या पडत आहेत. मनुष्यबळ कमी असल्याने रुग्णांची चांगलीच गैरसोय होत असल्याचे चित्र रुग्णालयात पाहायला मिळत आहे. शनिवारी रुग्णालयातील ओपीडीमध्ये रुग्णांची संख्या अचानक वाढल्याने एका बेडवर दोन रुग्ण ठेवण्याची वेळ रुग्णालय प्रशासनावर आली होती. तसेच या ठिकाणी वेळेवर डॉक्टरही नसल्याने उपचार मिळण्यास उशीर होत असल्याचा आरोप काही रुग्णांच्या नातेवाइकांनी करीत रुग्णालय प्रशासनावर आपला रोष व्यक्त केला.

दोन तास डॉक्टरांची प्रतीक्षा इर्विन रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आलेल्या महिलांचीही वेळेत तपासणी होत नसल्याची माहिती महिलांनी दिली. संबंधित तज्ज्ञ डॉक्टर व येथील कर्मचाऱ्यांशी वारंवार संपर्क साधूनही दोन ते तीन तास डॉक्टरांची वाट पाहावी लागल्याचे  तपासणीसाठी आलेल्या महिलांचे म्हणणे आहे.

सर्वत्र दुर्गंधीइर्विन रुग्णालयातील अनेक वॉर्डांमध्ये कमालीची दुर्गंधी पसरली आहे. त्याचा दर्प रुग्ण व नातेवाइकांमध्ये झिणझिण्या उठवितात. याशिवाय परिसरातही ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य आहे. त्याठिकाणी सफाई व्हावी, अशी मागणी होत आहे. 

रुग्णालयात मनुष्यबळाची कमी आहे. त्यामुळे येथे कार्यरत कर्मचाऱ्यांची तसेच डॉक्टरांची धावपळ होते. शनिवारी आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. साधना तायडे अमरावतीमध्ये आल्या होत्या. त्यांनाही रुग्णालयात मनुष्यबळ कमी असल्याची माहिती दिली. - नरेंद्र सोळंके, आरएमओ, इर्विन

 

टॅग्स :hospitalहॉस्पिटल