शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

इर्विनमध्ये तरुणास तलवारीसह अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 22:50 IST

शर्टाच्या मागील भागात तलवार लपून फिरणाऱ्या एका तरुणास इर्विन रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांनी शुक्रवारी दुपारी पकडले. पोलिसांशी हुज्जत घालून पळून जाण्याचा आरोपी प्रयत्न करीत असल्यामुळे त्याला पोलिसांनी चोप दिला.

ठळक मुद्देसुरक्षा रक्षक नदीम पठाणची सतर्कता : आरोपीला पोलिसांकडून चोप

अमरावती : शर्टाच्या मागील भागात तलवार लपून फिरणाऱ्या एका तरुणास इर्विन रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांनी शुक्रवारी दुपारी पकडले. पोलिसांशी हुज्जत घालून पळून जाण्याचा आरोपी प्रयत्न करीत असल्यामुळे त्याला पोलिसांनी चोप दिला. याप्रकरणी गौरव शंकर धुर्वे (२८, रा. समाधाननगर) याच्याविरुद्ध कोतवाली पोलिसांनी आर्म्स अ‍ॅक्टचा गुन्हा नोंदविला.पोलिसांशीही अरेरावीगौरव धुर्वे हा बाह्यरुग्ण कक्षात संशयास्पद स्थितीत फिरत असून, शर्टाच्या मागील भागात त्याने काही तरी लपविल्याचे सुरक्षा रक्षक नदीम पठाण यांच्या लक्षात आले. त्यांनी सहकारी अमोल घोटे यांच्या मदतीने गौरवला पकडले. त्याने तीव्र विरोध केला; मात्र सुरक्षा रक्षकांनी गौरवला इर्विन चौकीतील पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी तलवार जप्त करण्याचे प्रयत्न करताच, तो धक्काबुक्की करायला लागला होता. पोलीस कर्मचारी मिलिंद गवई, तुबोकार यांनी त्याला ताब्यात घेतले. या घटनेची माहिती नियंत्रण कक्षामार्फत कोतवाली पोलिसांना देण्यात आली. काही वेळातच इर्विनमध्ये ताफा दाखल झाला. पोलिसांनी गौरवला ताब्यात घेतले. त्याने मद्यपान केल्याचे पोलिसांना आढळून आले. यावेळी इर्विनमध्ये बघ्यांची गर्दी होती.‘तो’ आला वचपा काढण्यासाठीगौरव धुर्वेचा तीन दिवसांपूर्वी अजय कंगाले नामक व्यक्तीशी वाद झाला होता. अजय हा इर्विन रुग्णालयात असल्याची माहिती गौरवला शुक्रवारी मिळाली. त्याच्यावर हल्ला करण्यासाठी बेताने इर्विन रुग्णालयात तलवार घेऊन दाखल झाल्याची माहिती गौरवने कोतवाली पोलिसांनी दिली.