शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

रक्तसंकलनासह अंधत्व नियंत्रणात ‘इर्विन’ अव्वल

By admin | Updated: November 25, 2015 00:47 IST

एरवी जिल्हा सामान्य रुग्णालय अर्थात इर्विनमधील एकंदरीत व्यवस्था टिकेच्या लक्ष्यस्थानी असते.

जिल्हा शल्यचिकित्सक प्रथम : शासकीय रुग्णालयांचे मूल्यांकन अमरावती : एरवी जिल्हा सामान्य रुग्णालय अर्थात इर्विनमधील एकंदरीत व्यवस्था टिकेच्या लक्ष्यस्थानी असते. सामाजिक आणि राजकीयमधील संघटनांचा पदाधिकारी नेहमी इर्विनच्या नावे खडे फोडतात. अशा सर्वांसाठी इर्विनचे यश तोंडात बोट घालणारे ठरणार आहे. थोड्याथोडक्यात नव्हे ५ ते ६ विभागांमध्ये इर्विनने पहिला व दुसरा क्रमांक पटकावला आहे. इर्विन अर्थात अमरावतीचे सामान्य रुग्णालय आरोग्य सुविधा देण्यास अव्वल ठरले आहे. इर्विनमधील ब्लड बँकेने अव्वल क्रमांक पटकावला आहे. वर्षभरात २८४ शिबिरांतून १८,५३८ पिशव्या रक्तसंकलन करून या ब्लड बँकेने इतर सर्व जिल्ह्यातील ब्लड बँकांना मागे टाकले. जानेवारी ते डिसेंबर २०१४ या कालावधीत ११७ रक्तसंकलन शिबिरे घेण्यात आलीत. त्यात ७९२० पिशव्या रक्तसंकलन करून शासकीय रुग्णालयात रक्तपेढीचे पाचव्या क्रमांकावर मूल्यांकन झाले. तसेच १ जानेवारी ते २८ आॅक्टोबर २०१५ या कालावधीत १६७ शिबिरे घेण्यात आलीत. त्यात १०,६०९ पिशव्या रक्तसंकलन करण्यात आले. शासकीय रुग्णालयीन रक्तपेढीमध्ये झालेल्या मूल्यांकनात अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाला प्रथम क्रमांक मिळाला. जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये केवळ जिल्ह्यातूनच नव्हे, तर अकोला, वाशीम, बुलडाणा, यवतमाळ, हिंगोली, मराठवाडा आणि नजीकच्या मध्यप्रदेशातूनसुध्दा अनेक रुग्ण उपचारासाठी येतात. (प्रतिनिधी)