शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

इर्विन, डफरीनचा होणार कायापालट

By admin | Updated: February 2, 2015 22:57 IST

जिल्हाभरातील रुग्णसेवेचा भार उचलणाऱ्या येथील जिल्हा सामान्य रुग्णालय व जिल्हा स्त्री रुग्णालयाचा कायापालट करण्यासाठी शासनाकडे विशेष निधी मंजूर केला आहे. मार्चमध्ये

अमरावती : जिल्हाभरातील रुग्णसेवेचा भार उचलणाऱ्या येथील जिल्हा सामान्य रुग्णालय व जिल्हा स्त्री रुग्णालयाचा कायापालट करण्यासाठी शासनाकडे विशेष निधी मंजूर केला आहे. मार्चमध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पात मंजूर ४५ कोटींचा निधी निर्गमित होऊन इर्विन, डफरीनचे बळकटीकरण केले जाईल, अशी माहिती आ. सुनील देशमुख यांनी येथे सोमवारी दिली.येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने राबविण्यात आलेले विविध उपक्रम, रस्ते निर्मितीचा आढावा घेतला असता त्यांनी ही माहिती दिली. आ. देशमुख यांच्या मते, डफरीनची १८९ खाटांची अपुरी संख्या लक्षात घेता ती २०० खाटांची करण्यासाठी २८ आॅगस्ट २००९ मध्ये शासनाने मंजुरी दिली होती.मात्र मागील पाच वर्षांचा कार्यकाळात या इमारतींना प्रशासकीय गती देण्यात आली नाही. त्यामुळे नागपूर विधिमंडळात ही बाब आवर्जून उपस्थित करुन मंजूर ४५ कोटी रुपये निर्गमित होताच इर्विन, डफरीनचा कायापालट होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. तसेच एआरएचएम अंतर्गत शहरात आरोग्य सेवा पुरविण्यासाठी शासनाने २०१३ रोजी २८ कोटी रुपये मंजूर केले होते. परंतु हा निधी आजतागायत अखर्चित असून हा निधी मिळाल्यास इर्विन, डफरीनच्या जुन्या इमारतीचे नूतनीकरण, दुरुस्ती, रस्ते, द्वार उभारणी आणि निवासस्थानाची कामे केली जाणार आहे. त्याचप्रमाणे वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता काही प्रमुख रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याचे ठरविले आहे. हे मार्ग केंद्रीय रस्ते अनुदानातून केले जाणार असून पाठपुरावा केला जात आहे. यात पंचवटी चौक ते नवसारी, पंचवटी चौक ते इर्विन चौक, रेल्वे स्टेशन चौक ते इर्विन, चपराशी पुरा ते रेल्वे स्टेशन, मालवीय चौक ते इतवारा बाजारपर्यत रस्ते निर्मितीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. मालवीय चौक ते नागपुरी गेट पर्यत १.३ कि.मी. च्या उड्डाणपुलाचे कार्य प्रस्तावित असून त्याकरिता ६० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. याव्यतिरिक्त बांधकाम विभागातर्फे फॉरेन्सिक लॅब, अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहाचे बांधकाम, विदर्भ ज्ञान विज्ञान महाविद्यायच्या मुलींचे वसतिगृह, पंजाबराव प्रबोधिनी, न्यायालयाची इमारत, जिल्हा नियोजन भवन आदी विकास कामांचा आढावा घेण्यात आला. अर्जुननगर परिसरातील वाहून जाणारे सांडपाणी, मालवीय चौकात तुंबणारे पावसाचे पाणी व संदर्भ सेवा टप्पा क्र. २ चे कामे गतीने करावीत, असे आ. देशमुख यांनी सुचविले. विकास कामंचा दर्जा उत्तम मिळावा, अन्यथा अधिकाऱ्यांनी खैर नाही अशी तंबीदेखील त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिली. यावेळी 'बी अ‍ॅन्ड सी' चे अधीक्षक अभियंता विजय बनगिनवार, कार्यकारी अभियंता भानोसे, एन. आर. देशमुख, उपअभियंता डी.के. देशमुख, अनिल जवंजाळ, चेतवानी, विनोेद शिरभाते आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)