शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

इर्विनच्या स्वच्छता कर्मचाऱ्यावर तलवारीने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 01:38 IST

किरकोळ वादातून एका तरुणाने जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्वच्छता कर्मचाºयावर तलवारीने हल्ला केला. ही घटना सोमवारी सायंकाळी ५.४५ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे इर्विन परिसरात प्रचंड खळबळ उडाली.

ठळक मुद्देगुन्हा दाखल : आरोपी कोतवाली पोलिसांच्या ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : किरकोळ वादातून एका तरुणाने जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्वच्छता कर्मचाºयावर तलवारीने हल्ला केला. ही घटना सोमवारी सायंकाळी ५.४५ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे इर्विन परिसरात प्रचंड खळबळ उडाली. सिध्दांत रंगराज पळसपगार (२०,रा. योगायोग कॉलनी) असे कोतवाली पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.बलराज प्रकाश मारवे (४०,रा. टीबी हॉस्टीटलमागील क्वार्टर परिसर) जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वच्छता कर्मचारी पदावर कार्यरत आहे. बलराज मारवे यांची सोमवारी दुपारी २ ते रात्री ८ वाजेपर्यंत ड्युटी होती. दरम्यान सायंकाळी वार्ड क्रमांक ८ समोर बलराज उभे असताना अचानक आरोपी सिंध्दात पळसपगार हा तलवार हाती घेऊन बलराजच्या अंगावर धावून गेला. बलराज यांनी प्रतिकार केला असता त्यांच्या हातावर व खाद्यावर तलवारीचे धाव बसले. सुदैवाने ती तलवार बोथट असल्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली नाही. मात्र, त्याच्या हातावर दोन ठिकाणी तलवारीने जखमा झाल्या. या झटापटीनंतर रुग्णालयात परिसरात प्रचंड गर्दी झाली. पेट्रोलिंगवर असलेले पोलीस कर्मचारी विजय बाहेनकर व शांताराम नन्नावरे यांनी आरोपीला पकडले. घटनेच्या माहितीवरून कोतवालीच्या पोलीस उपनिरीक्षक सुजाता बन्सोड व पोलीस कर्मचारी रुपेश खुरकटे यांनी तत्काळ इर्विन रुग्णालय गाठले. त्यावेळी आरोपी तलवार घेऊन फिरताना आढळून आला. पोलिसांनी आरोपी सिध्दांतला ताब्यात घेऊन ठाण्यात नेले. या घटनेची तक्रार बलराज मारवे यांनी कोतवाली पोलीसात नोंदविली.