शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

इर्विनचा मेळघाट सेल कुचकामी

By admin | Updated: January 31, 2015 23:12 IST

इर्विनमधील दाखल झालेल्या चिखलदरा येथील आदिवासी रुग्णांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला होता. मृतदेह गावी नेण्यासाठी नातेवाईकांनी पायपीट केल्यावर तब्बल दोन तासांनी मृतदेह गावी नेला.

अमरावती : इर्विनमधील दाखल झालेल्या चिखलदरा येथील आदिवासी रुग्णांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला होता. मृतदेह गावी नेण्यासाठी नातेवाईकांनी पायपीट केल्यावर तब्बल दोन तासांनी मृतदेह गावी नेला. त्यामुळे आदिवासी रुग्णांना आरोग्य सेवेबाबत मेळघाट सेलमधील कर्मचारी हलगर्जीपणा करीत असल्याचे आढळून आले आहे. आदिवासी नागरिकांना आरोग्य सेवा देण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात मेळघाट सेलची स्थापन करण्यात आली आहे. त्याकरिता मेळघाट सेलमध्ये ६ कर्मचारी सज्ज आहेत. हे कर्मचारी दोन पाळीत काम करीत असून अनेकदा मेळघाट सेलच्या कक्षात एकही कर्मचारी उपस्थित नसल्याचे आढळून आले आहे. आदिवासी नागरिकांची भाषा समजावी याकरिता कोरकू समाजातील काही जणांची मेळघाट सेलमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र वेळेवरच कर्मचारी उपस्थित नसल्याने रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. चिखलदरा येथील रहिवासी रामलीला संजू दहीकर (३२, रा. गिरगुटी) या महिलेल्या ७५ टक्के भाजलेल्या अवस्थेत दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. इर्विनमध्ये मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आल्यावर तब्बल दोन तास मृतदेह शवविच्छेदनगृहात पडलेला होता. मात्र मृताच्या नातेवाईकांना मदत करण्यासाठी तेथे कोणीही उपस्थित नव्हते. अखेर काही रुग्णवाहिका चालकांनी सामाजिक बांधिलकी दर्शवून त्या आदिवासी नागरिकांना सहकार्य केले. मृतदेह गावी नेण्यासाठी नातेवाईकांजवळ पैसे सुध्दा नव्हते, त्यामुळे काही जणांनी जिल्हा शल्य चिकित्सक अरुण राऊत यांच्याशी मोबाईलवर संपर्क केला. त्यावेळी रुग्णवाहिकेची सोय करण्यात आली. आदिवासींना आरोग्य सुविधा पुरविण्यात मेळघाट सेलची अनास्था दिसून येत आहे. गोरगरीब आदिवासीसाठी शासनाकडून सुविधा देण्यात येते मात्र इर्विनच्या मेळघाट सेलमध्ये कर्मचारी कामात हलगर्जीपणा करीत असल्याचे आढळून येत आहे. (प्रतिनिधी)