शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भारनियमनामुळे सिंचनाचा प्रश्न!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 22:46 IST

कॅलिफोर्निया म्हणून विदर्भात परिचित असलेले मोर्शी-वरुड तालुक्यात भारनियमन वाढल्याने सिंचनाची कामे ठप्प आहेत. त्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत.

ठळक मुद्देसंत्राबागा जगवायच्या कशा ? : शेतकºयांचा सवाल, स्वत:लाच करावी लागते दुरुस्ती

लोकमत न्यूज नेटवर्कवरुड : कॅलिफोर्निया म्हणून विदर्भात परिचित असलेले मोर्शी-वरुड तालुक्यात भारनियमन वाढल्याने सिंचनाची कामे ठप्प आहेत. त्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. मागील दोन वर्षांत भूजल पातळी वाढली असताना भारनियमनामुळे संत्राबागांना व पिकांना फटका बसला. भारनियमनामुळे संत्राबागांना जगविणे कठीण झाले असल्याचे मत शेतकरी व्यक्त करीत आहेत.तालुक्यात सिंचनाखाली मोठ्या प्रमाणावर शेती असून हजारो हेक्टर जमीवर संत्राबागा फुलविल्या आहेत. संत्रा, मिरची, कपाशीसह आदी पिकांना या महिन्यात पाण्याची सक्त आवश्यकता असते. परंतु विहिरीत पाणी आहे. मात्र वीजपुरवठा नाही, अशी परिस्थती असल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. विशेष म्हणजे यंदा संत्रा झाडांवर आलेल्या रोगामुळे योग्य वेळी पाणी दिल्यास संजीवनी मिळू शकते, असे कृषी विभागाने सांगितले. यामुळे सिंचन करून झाडे जगविण्याचा प्रयत्न केला असताना भारनियमनाचा खोडा समोर उभा ठाकला आहे. कृषी विभागाकडून अनुदानावर मिळालेले केरोसीन पंप आता कालबाह्य झाले आहेत. दुसरीकडे केरोसीन मिळत नसल्याने अनेकांचे पंप धूळखात पडले आहेत.शेतकरीच करतात दुरुस्तीभारनियमन व अनिश्चित बिघाड या दोन्ही गोष्टींमुळे शेतकरी त्रस्त आहे. तक्रारी, विनंती करूनही अवेळी बिघाड काढण्यास वीज कर्मचारी येत नाही, तर बिघाड दुरुस्त झाल्यास वीज भारनियमन असते. यामुळे एक-दोन दिवस विनाकारण वाया जातात. परिणामी शेतकरी स्वत:च संबंधित रोहित्रांवर जाऊन दुरुस्ती करीत असल्याचे चित्र तालुक्यात पहायला मिळत आहे.लोंबकळलेल्या तारांचाही प्रश्नशेतामधून जाणाºया विद्युत तारांना गार्डींग नसल्याने अनेक ठिकाणी तारा लोंबकळलेल्या आहेत. यामुळे एखादा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे वीज वितरण कंपनीच्या अधिकारी-कर्मचारी सपशेल दुर्लक्ष करीत आहेत.जबाबदारी कुणाची ?कुठलीही तांत्रिक माहिती किंवा सरंक्षण नसताना केवळ पिके वाचविण्याकरिता जीव धोक्यात घालून शेतकºयांना वीज दुरुस्ती करावी लागत असल्याने अपघात झाल्यास या शेतकºयांची जबाबदारी कुणावर, हा प्रश्न निर्माण होतो. यामुळे आता राज्य शासनाने वीज कंपनीकडून शेतकºयांनाच विद्युत दुरुस्तीचे तांत्रिक प्रशिक्षण द्यावे अन्यथा वीज कर्मचारी वेळेवर पाठवून त्वरित वीजपुरवठा सुरु करावा, अशी मागणी आहे.संत्रापिकांना योग्यवेळी पाणी मिळणे गरजेचे आहे. मात्र भारनियमन असल्याने त्यांना ऐनवेळेवर पाणीच मिळत नसल्याने संत्राबागा जगविणे कठीण झाले आहे. या गंभीर प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.- विलास तट्टे, संत्रा उत्पादक