शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

२८८४ कोटींचा सिंचन अनुशेष तरीही सोफियाला पाणी !

By admin | Updated: March 21, 2016 00:05 IST

जिल्ह्यात तब्बल २८८४ कोटींचा सिंचन अनुशेष असताना पिण्याचे आणि सिंचनाचे ८७ दलघमी पाणी सोफियाला दिले गेले.

२४.४० टक्के सिंचन क्षमता : २३२ कोटींच्या करारालाही कंपनीने फासला हरताळ अमरावती : जिल्ह्यात तब्बल २८८४ कोटींचा सिंचन अनुशेष असताना पिण्याचे आणि सिंचनाचे ८७ दलघमी पाणी सोफियाला दिले गेले. सिंचन अनुशेषाच्या मुद्यावर घशाला कोरड पडेपर्यंत बोलणारे नेते सोफियाला दिल्या गेलेल्या पाण्याबद्दल मात्र ‘ब्र’ काढायला तयार नाहीत. राज्याच्या निर्मितीपासूनच जिल्ह्यासह अमरावती विभागाच्या सिंचनाकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. दांडेकर समितीच्या अहवालाप्राणे जून १९८२ मध्ये राज्याची सरासरी निर्मित सिंचनक्षमता एकूण पिकाखालील क्षेत्राच्या तुलनेत २२.५५ टक्के होती. या तुलनेत अमरावती विभागाची निर्मित सिंचनक्षमता ९.०२ टक्के होती व राज्य सरासरीला येण्यास अमरावती विभागाचा अनुशेष ४,१६,८७० हेक्टरचा निश्चित झाला. निर्देशांक व अनुशेष समितीने अंतिम अहवाल सप्टेंबर २००० मध्ये सादर केला. या अहवालाप्रमाणे जून १९९४ मध्ये राज्याची सरासरी निर्मित सिंचनक्षमता ३५.११ टक्के तर अमरावती विभागाची १३.२५ टक्के होती. राज्य सरासरीला (३५.११) येण्यास अमरावती विभागाचा अनुशेष ६,८५,६७० हेक्टर निश्चित झाला. तो पुढे सन २०१२ मध्ये ९,९७,४२० हेक्टर झाला. यात १९९४ चा शिल्लक अनुशेष जवळपास २.३० लाख हेक्टरचा आहे. (प्रतिनिधी)अमरावतीचा अनुशेष २ लाख ६९ हजार हेक्टरजून २०१२ च्या अहवालानुसार जलसंपदा विभागाने सिंचन अनुशेष जाहीर केला आहे. यात जिल्ह्यातील निव्वळ पेरणीक्षेत्र ७ लाख ५१ हजार १०० हेक्टर आहे. यानुसार जिल्ह्यात केवळ २४.४० टक्के सिंचन निर्मिती झाली. अद्यापही जिल्ह्यात २ लाख ६९ हजार ४४ हेक्टर क्षेत्रात सिंचन अनुशेष कायम आहे. या अनुशेषाची रक्कम तब्बल २८८४.२८ कोटी आहे. सिंचनाचा अनुशेष कायम असताना औष्णिक विद्युत प्रकल्पाला २४ हजार हेक्टरच्या सिंचनाचे पाणी कसे दिले गेले? हे मात्र अनुत्तरितच आहे. विभागात १० लाख हेक्टरचा अनुशेषराज्य सरासरी ६०.२७ टक्क्याच्या तुलनेत जून २०१२ पर्यंत निर्मित क्षमतेप्रमाणे महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने जिल्हानिहाय अनुशेष जाहीर केला आहे. यात अमरावती विभागाचा एकत्रित अनुशेष ९ लाख ९७ हजार हेक्टर व अनुशेषाची रक्कम १०,६७७ कोटी रुपये आहे. ३२ प्रकल्प सिंचन अनुशेषात जिल्ह्यातील ३२ सिंचन प्रकल्पांचा सिंचन अनुशेषांतर्गत समावेश करण्यात आला आहे. अप्परवर्धा प्रकल्पासह चार मध्यम प्रकल्प असताना सिंचनक्षमतेत वाढ झालेली नाही. सिंचनाचा अभाव हे शेतकरी आत्महत्यांचे प्रमुख कारण आहे. अनुशेष निर्मूलनासाठी दरवर्षी निधी दिला जातो. तथापि कोट्यवधींचा निधी खर्च होत असताना सिंचनक्षमता निर्मिती मात्र नाममात्रच आहे. निर्देशांक व अनुशेष समितीच्या अहवालास मान्यता देताना मंत्रिमंडळाने सन १९९४ चा अनुशेष दूर करताना नवीन अनुशेष निर्माण होणार नाही, असा निर्णय घेतला होता. मात्र, अमरावती जिल्ह्यासह विभागाचा अनुशेष सतत वाढत चालला आहे. असे असतानाही नव्याने सिंचन क्षमतांची निर्मिती तर झालीच नाही. उलटपक्षी १२ लाख लोकसंख्येचे पाणी सोफियाला दिले गेले. त्या मोबदल्यात २३२ कोटींचा करार करण्यात आला. त्या करारालाही हरताळ फासला गेला.