शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईन बदल्यांमध्ये अनियमितता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 22:15 IST

जिल्हा परिषदेंतर्गत प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची आॅनलाईन प्रक्रिया याच आठवड्यात आटोपली. यामध्ये प्रचंड अनियमितता झाल्याचा आरोप करीत विस्थापित शिक्षक संघर्ष कृती समितीद्वाता त्वरित यादी दुरूस्तीची मागणी करीत प्रशासनाविरोधात एल्गार पुकारला. शनिवारी शेकडोच्या संख्येनी उपस्थित राहून पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांसह विभागीय आयुक्तांना निवेदन दिले.

ठळक मुद्देशासनाला निवेदन : विस्थापित शिक्षक संघर्ष कृती समिती आक्रमक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषदेंतर्गत प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची आॅनलाईन प्रक्रिया याच आठवड्यात आटोपली. यामध्ये प्रचंड अनियमितता झाल्याचा आरोप करीत विस्थापित शिक्षक संघर्ष कृती समितीद्वाता त्वरित यादी दुरूस्तीची मागणी करीत प्रशासनाविरोधात एल्गार पुकारला. शनिवारी शेकडोच्या संख्येनी उपस्थित राहून पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांसह विभागीय आयुक्तांना निवेदन दिले.आॅनलाईन बदल्यांमध्ये सर्व सवंर्गनिहाय याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या नाहीत. शिक्षकांच्या संवर्गनिहाय व शाळानिहाय रिक्त पदांची संख्या प्रसिद्ध केलेली नाही. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन बदल्यांपूर्वी करण्यात आलेले नाही. आंतरजिल्हा बदलीने रिक्त झालेल्या जागा दाखविण्यात आलेल्या नाहीत. यामुळे बदली प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव जानवतो, असा आरोप कृती समितीने केला आहे. महिला शिक्षकांनी आधीच दुर्गम भागात सेवा दिलेली आहे. तरीसुद्धा दुर्गम भागात पाठविले आहे. यासह अनेक शासन नियमांचे उल्लंघन बदली प्रक्रियेत झाले आहे. शिक्षकांवर अन्याय करणारी अनावश्यक विस्थापना असल्यामुळे शिक्षकांनी या प्रक्रियेमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप केला. यामध्ये तत्काळ दुरूस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येऊन उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी विलास देशमुख, रवीकिरण सदानशिव, उमेश वाघ, रवींद्र यावले यांच्यासह शेकडो शिक्षक उपस्थित होते.