शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य पाईपलाईनमधून दूषित पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:10 IST

अंजनगाव सुर्जी व अचलपूर तालुक्याच्या सीमेवरील शहानूर धरणातून पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा केला जातो.

जीवन प्राधिकरणचे अक्षम्य दुर्लक्ष : नागरिकांच्या आरोेग्याशी खेळलोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी : अंजनगाव सुर्जी व अचलपूर तालुक्याच्या सीमेवरील शहानूर धरणातून पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र, आठ वर्षांपूर्वी टाकलेल्या पाईपलाईनच्या कामात भ्रष्टाचार झाल्याने सद्यस्थितीत या पाईपलाईनमधून ७९ गावांना पाणी पुरवठा केला जातो. या सर्वच गावांना दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. शहानूर धरण हे दर्यापूर-अंजनगाव सुर्जीसाठी वरदान ठरले आहे. अंजनगाव व सुर्जी हे जुळे शहर व ७९ खेडी, तर दर्यापूर शहर व १७९ खेड्यांमध्ये शहानूरमधून पाणीपुरवठा केला जातो. विना विद्युतपुरवठा ग्रामस्थांना पाणी मिळत असल्याने ग्रामस्थ आनंदी आहेत. परंतु त्याकाळात शहानूर धरणातून गावांना पाणीपुरवठा करण्याकरिता टाकण्यात आलेल्या पाईपलाईनचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. ही पाईपलाईन जमिनीच्या आत २ मीटर खोदकाम करून टाकण्याचे नमूद असताना केवळ एक ते दीड फूट अंतरावरच ही पाईपलाईन टाकण्यात आली आहे.अलीकडेच शहरातील अंजनगाव सुर्जी - दर्यापूर या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असताना रस्त्याच्या बाजूला सांडपाण्याच्या गटाराचे काम करीत असताना या पाण्याची पाईपलाईन वरच असल्याचे दिसून आले. ही पाईपलाईन फुटलेली आढळली. त्यामध्ये घाण पाणी मिसळत आहे. मागील अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे समोर आले आहे. याबाबतची माहिती मिळताच आ.रमेश बुंदिले, नगराध्यक्ष कमलकांत लाडोळे, वीज वितरण कंपनीचे सोनोने, पाणीपुरवठा विभागाचे पोकुलवार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाईपलाईनची पाहणी केली असता त्यांनाही हा गंभीर प्रकार दिसून आला. याबाबत, त्यांनी प्राधिकरणचे अभियंता सिनकर यांच्याशी संपर्क साधून विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. आमदार रमेश बुंदिले यांनी त्यांची खरडपट्टी काढून तत्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिलेत. रोगराईला निमंत्रणघाण पाणी पाईपलाईनमध्ये शिरून नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होण्याची बाब अतिशय गंभीर आहे. यामुळे विविध आजार बळावले असून नागरिकांच्या आरोग्याला धोका उत्पन्न झाला आहे. यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.