शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

बीएसएनएलची अनियमित सेवा

By admin | Updated: October 13, 2014 23:15 IST

दूरसंचार क्षेत्रात शासकीय सेवा म्हणून काम करणाऱ्या बीएसएनएल कंपनीला ग्राहकांकडून चांगली मागणी आहे. परंतु चांदूरबाजार तालुक्यात काही दिवसांपासून ही सेवा विस्कळीत झाली आहे.

चांदूरबाजार : दूरसंचार क्षेत्रात शासकीय सेवा म्हणून काम करणाऱ्या बीएसएनएल कंपनीला ग्राहकांकडून चांगली मागणी आहे. परंतु चांदूरबाजार तालुक्यात काही दिवसांपासून ही सेवा विस्कळीत झाली आहे. मोबाईल सेवेत अनेक अडथळे येत असून इंटरनेट सेवेचीही तीच गत झाली आहे. त्यामुळे बीएसएनएल सेवा अनियमित झाली आहे.दूरसंचार क्षेत्रात मोठे संशोधन झाल्याने दिवसेंदिवस ही सेवा 'अपडेट' होते आहे. या क्षेत्रात बीएसएनएलसह अनेक खासगी कंपन्यादेखील काम करीत आहेत. त्यामुळे या क्षेत्रात मोठी स्पर्धा आहे. म्हणून बीएसएनएलसह खासगी कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक योजना कार्यान्वित करीत आहेत. मोबाईलच्या ब्रॉडबँड, लॅन्डलाईन सुविधा फक्त बीएसएनएल कंपनीकडेच असल्याने साहजिकच या कंपनीकडे मोठा ग्राहक वर्ग जुळला आहे. त्याचप्रमाणे बीएसएनएल कंपनी ही शासकीय कंपनी असल्याने विश्वासार्हता व आपुलकी म्हणून ग्राहकांचा ओढा या कंपनीकडे जास्त होती. म्हणून चांदूरबाजार तालुक्यात बीएसएनएल कंपनीकडेच मोठ्या प्रमाणात ग्राहक संख्या आहे. सध्या इंटरनेट ही अशी आवश्यक सेवा झाली आहे. त्यामुळे या क्षेत्रात विविध कंपन्यांत मोठी स्पर्धा सुरू आहे. जास्तीत जास्त ग्राहक आपल्या कंपनीकडे यावे याकरिता खासगी कंपन्यांकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध सोईसुविधा व सवलती देण्यात येत आहेत. या तुलनेत बीएसएनएलकडून ग्राहकांना सोई व सुविधा अपुऱ्या पडत असल्याने दिवसेंदिवस ग्राहकसंख्या रोडावत चालली आहे. चांदूरबाजार तालुक्यात तसेच शहरात अजूनही बीएसएनएलची इंटरनेट सेवासुद्धा व्यवस्थित मिळत नाही. अनेकदा शनिवार व रविवारी इंटरनेट कनेक्ट होतच नाही. तसेच इंटरनेट कनेक्ट झाल्यानंतर वारंवार बंद पडते. इंटरनेटची गतीसुद्धा इतर कंपन्यांच्या तुलनेत ढिम्म आहे. लॅन्डलाईन सेवा देखील वारंवार खंडित होत असते. याबाबत ग्राहकांनी संबंधित कार्यालयात तक्रार केल्यानंतरही त्या तक्रारीची दखल घेतली जात नाही, अशी अनेक ग्राहकांची तक्रारी आहे. तसेच बीएसएनएलचे वरिष्ठ अधिकारी कारवाई करणार काय? चांदूरबाजार येथील बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना वरिष्ठांकडूनच अभय देण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. (तालुका प्रतिनिधी)