शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तिरुपती टॉवरमध्ये ‘आयपीएल’वर सट्टा

By admin | Updated: April 21, 2017 00:15 IST

स्थानिक अंबादेवी रस्त्यावरील तिरूपती टॉवर्समध्ये सुरू असलेल्या सट्यावर धाड घालून पोलिसांनी १.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

१.८७ लाखांचा ऐवज जप्त : हुक्कापार्लरही बेकायदेशीर अमरावती : स्थानिक अंबादेवी रस्त्यावरील तिरूपती टॉवर्समध्ये सुरू असलेल्या सट्यावर धाड घालून पोलिसांनी १.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याच ठिकाणी बेकायदेशीररीत्या हुक्का पार्लर चालविण्यात येत असल्याची धक्कादायक बाब कारवाईदरम्यान उघड झाली. सध्या सुरू असलेल्या आयपीएलमधील दिल्ली डेअर डेव्हिल्स आणि सनराईजर्स हैद्राबाद या संघात झालेल्या लढतीवर सट्टा लावला जात होता. ९ सट्टेबाजांना अटक करण्यात आली. त्यात दोन अल्पवयीनांचा समावेश आहे.तिरूपती टॉवरस्थित ‘हॉटपॉट कॅफे’मध्ये अवैधरीत्या हुक्का पार्लर चालविले जात असल्याच्या माहितीवरून गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी सायंकाळी येथे धाड टाकली. यात पार्लरचा मालक मोहनीश माखिजा आणि विक्की आसाणी हे सध्या सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट टी-२० मालिकेतील दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि सनराईजर्स हैद्राबाद यासंघांच्या लढतीवर सट्टा लावत असल्याचे उघड झाले. बॉलवर रक्कम लावून जुगार खेळला जात असल्याचे सिद्ध झाल्यानंतर ९ जणांना ताब्यात घेण्यात आले. पार्लरमध्ये काही व्यक्ती हुक्का पीत असल्याचे लक्षात आल्यानंतर परवान्याची मागणी करण्यात आली. मात्र, संबंधित आरोपी कुठलाही परवाना दाखऊ शकले नाहीत. विक्की गोपीचंद आसाणी आणि मोहनीश माखिजा हे ‘हॉटपॉट कॅफे’चे मालक असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून आरोपी बेकायदेशिररित्या हुक्कापार्लर चालविण्याबरोबरच आयपीएलवर सट्टा खेळत असल्याची बाब उघड झाल्याने आरोपींकडून १ लाख ८७ हजार १८५ रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. याशिवाय घटनास्थळावरून हुक्का ओढण्याकरीता वापरण्यात येत असलेले हुक्कापात्र हस्तगत करण्यात आले. आरोपींविरूद्ध जुगार प्रतिबंधक कायदा सहकलम ३३ (डब्ल्यू) (अ) महाराष्ट्र पोलीस कायदा सहकलम १८८, भादंविच्या सहकलम ४,२१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)हे आहेत आरोपीरोहित रुद्र विश्वकर्मा रविनगर, अनिकेत रमेश कापडिया (श्री कॉलनी), विक्की गोपीचंद आसाणी (कृष्णानगर), संदीप गोपीचंद आसाणी (कृष्णानगर), संतोष दौलतराम जैसवाणी (रामपुरी कॅम्प), लखन मेघानी, मोहनिष माखिजा.