शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

विद्यार्थिनीला मारहाण प्रकरणाची चौकशी पूर्णत्वाकडे

By admin | Updated: September 15, 2015 00:14 IST

मागील १५ दिवसांपूर्वी एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीला भर रस्त्यात महिला पोलीस उपनिरीक्षकाने कानशिलात लगावली होती.

जबाब नोंदविले : पीएसआयवर कारवाईची टांगती तलवार, सीसीटीव्ही फुटेजच्या स्लीपही जोडल्यासुनील देशपांडे अचलपूरमागील १५ दिवसांपूर्वी एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीला भर रस्त्यात महिला पोलीस उपनिरीक्षकाने कानशिलात लगावली होती. या प्रकरणाची चौकशी जवळपास पूर्ण झाली असून त्याचा अहवाल येत्या दोन-तीन दिवसांत जिल्हा पोलीस अधीक्षकांसमोर ठेवला जाणार असल्याची माहिती आहे. सदर 'थप्पड मार' प्रकरणाला 'लोकमत'ने वाचा फोडली होती. या प्रकरणाकडे अचलपूर-परतवाड्यातील महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींचे लक्ष लागले आहे. दरम्यान, हे प्रकरण आपसात मिटविण्यासाठी काही पोलीस अधिकारी प्रयत्नशील असल्याची चर्चा जनतेत आहे. अचलपूर येथील जगदंब महाविद्यालयात विज्ञान शाखेत तृतीय वर्षाला शिकत असलेली विद्यार्थिनी २८ आॅगस्ट रोजी शुक्रवारी सायंकाळी तिच्या आत्यासोबत स्कुटीने चावलमंडी या वर्दळीच्या रस्त्यात गेली व तिच्या रस्त्याच्या बाजूला गाडी लावलेली होती. तेवढ्यात महिला पोलीस उपनिरीक्षक पद्मशिला तिरपुडे यांनी तेथे येऊन तिला वाहन परवाना मागितला व काही कारण नसताना तिच्या कानशिलात थप्पड लगावली होती. या प्रकरणाचे पडसाद जुळ्या शहरात उमटले होते. स्नेहलने महिला पोलीस उपनिरीक्षकाची लेखी तक्रार दुसऱ्या दिवशी २९ आॅगस्ट रोजी आपले वकील व्ही.आर. घाटे ह्यांना सोबत घेऊन पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांच्याकडे केली. तसेच 'लोकमत'ने ३१ आॅगस्ट व १ सप्टेंबर रोजी याबाबत सविस्तर वृत्त दिले होते. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश जि.पो. अ. (ग्रामीण) गौतम ह्यांनी दिले होते. या प्रकरणाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर कदम व त्यांचे सहाय्यक वसंत करई यांचेकडे होती. चौकशीत स्नेहल रोडगे, हिच्या सह ज्यांनी प्रत्यक्ष घटना बघितली ते गजानन सालकूटे, शरद काकडे तिची आत्या बेबीताई डहाके (६६) तसेच मनीष खंडेलेवाल, मुंगाशेट व तिचे वडील गजाननराव रोडगे इत्यादींचे जवाब नोंदविण्यात आले आहेत. या जबाबासोबत सीसीटीव्ही कॅमेरातील फूटेजची स्लीपही जोडण्यात आली आहे. पीएसआय तिरपुडे यांनी अरेरावी करुन स्नेहलला केलेल्या मारहाणप्रकरणी नरेंद्र फिसके, माजी सरपंच दिलीप राऊत, प्रहारचे सतीश आकोलकर, भाजपाचे शहर उपाध्यक्ष श्रीधर क्षीरसागर, माधुरी शिंगणे उपविभागीय अधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले आहे. मला भर रस्त्यात पीएसआय तिरपुडे यांनी माझ्या कानशिलात मारून अपमानित करण्याची घटना मी विसरू शकत नाही. महिलांना आपल्या राज्यात अशाच प्रकारचे संरक्षण आहे का, असा प्रश्न मी मुख्यमंत्री देवेंद्रकाकांना (फडणवीस) पत्र पाठवून विचारणार आहे. म्हणजे कुठल्याही विद्यार्थिनीला पोलीस विनाकारण मारहाण करण्याची हिम्मत करणार नाही. तसेच मला या प्रकरणात 'लोकमत'ने खरा आधार देऊन न्यायासाठी माझ्या प्रकरणाला वाचा फोडली, यात शंकाच नाही.- स्नेहल रोडगे ,विद्यार्थिनी, जगदंब महाविद्यालय.या प्रकरणाबद्दल न्यायालयात भादंविच्या कलम ३२३ प्रमाणे दावा टाकण्याची आमची प्राथमिक तयारी पूर्ण झाली. पीएसआय तिरपुडे यांनी कायदा हातात घेऊन स्नेहलच्या कानशिलात लगावली. तेही भर रस्त्यात अपमानित केले, हे गैर कायदेशीर आहे. याचा फौजदारी दावा दाखल करून न्यायालयातही दाद मागणार आहे.- व्ही.आर. घाटे,स्नेहलचे वकील.