शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
4
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
5
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
6
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
7
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
8
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
9
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
10
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
11
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
12
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
13
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
14
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
15
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
16
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
17
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
18
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
19
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
20
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे

मानवतेच्या तीर्थावर माणुसकीचा परिचय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 23:13 IST

वं. तुकडोजी महाराज यांच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त सोमवारी गुरुकुंज येथे महासमाधी परिसरातील महामार्गावर लाखो गुरुदेव भक्तांची चिकार गर्दी जमली होती. दरम्यान अम्ब्युलन्स आल्यानेर् पुन्हा मानवतेचा परिचय देत एकीकडे मार्ग मोकळा केला गेला.

ठळक मुद्देअवकाशात ड्रोन कॅमेऱ्याची जुगलबंदी : सोहळ्यात शिस्तबद्ध नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्कगुरुकुंज(मोझरी) : वं. तुकडोजी महाराज यांच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त सोमवारी गुरुकुंज येथे महासमाधी परिसरातील महामार्गावर लाखो गुरुदेव भक्तांची चिकार गर्दी जमली होती. दरम्यान अम्ब्युलन्स आल्यानेर् पुन्हा मानवतेचा परिचय देत एकीकडे मार्ग मोकळा केला गेला.राष्ट्रसंतांना मौन श्रद्धांजली अर्पण करण्याची वेळ समीप येत होती. दुसरीकडे गुरुदेव भक्तांचा ओढा गुरुमाऊलीच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या महासमधीकडे वाढत होता. अनेक गुरुदेवभक्त, पोलिसांच्या नियोजनाच्या तारत्म्यावर नाराज होते. त्यांचेच अनेक भक्त जागेअभावी रस्त्याला कवेत घेऊन तेथेच पदनस्त झाले आणि अकस्मात काही वेळेच्या अंतराने दोन रुग्णवाहिका सायरनच्या आवाजात रस्त्यावर आल्या आणि गुरुमाऊच्या शिस्तीच्या तालमितील गुरूदेवभक्तांनी लगेच मार्ग मोकळा करून दिला हे विशेष.याचबरोबर सोमवारी प्रशासन आणि सर्वसामान्यांच्या ड्रोन कॅमेºयाची अवकाशात जुगलबंदी दिसून आली प्रत्येक गुरुदेवभक्तांवर त्याची सुरक्षेच्या दृष्टीने अखेरपर्यंत नजर होती, हे विशेष.वं. राष्टÑसंत श्री तुकडोजी महाराजांच्या सुवर्ण पुण्यतिथी महोत्सवाकरिता यंदा गुरूकुंजात दरवर्षीच्या तुलनेने अधिक गुरूदेव भक्तांनी उपस्थिती लावली. अंदाजे पाच लाखांच्यावर गुरूदेवभक्त कार्यक्रमाकरिता महासमाधी व सभामंडपात उपस्थित झाले. यंदा मुख्य सभामंडप आणि दोन उपमंडप तयार करण्यात आले होते. तरीही यंदाच्या गर्दीने सभामंडपाला कवेत घेऊन राष्टÑीय महामार्ग मौनश्रद्धांजली अर्पण करण्याकरिता काबिज केला. परिणामी वाहतूक पोलिसांची या दरम्यान प्रचंड दमछाक झाली. शिस्तीचा भोक्ता असणाºया गुरूदेव भक्ताला अखेरच्या क्षणापर्यंत जागेसाठी भटकावे लागले. शेवटी ४.५० मिनिटांनी महामार्ग थांबविण्यात आला आणि लाखो गुरूदेव भक्त महामार्गावर आसनस्थ झाले आणि आपल्या गुरूमाऊलीला शिस्तीत मौन श्रद्धांजली अर्पण केली. आजच्या या कार्यक्रमाला राजकीय पुढाºयांनी उपस्थिती लावली. त्यामध्ये खा. आनंदराव अडसूळ, माजी मंत्री वसंत पुरके, आ. रवि राणा, आ. यशोमती ठाकूर, आ. किर्तीकुमार भांगडीया, नवनीत राणा, निवेदिता चौधरी-दिघडे, दिनेश सूर्यवंशी तसेच अखिल भारतीय श्रीगुरूदेव सेवामंडळ संचालक मंडळ व समस्त पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते हे कविशेष.गुरुदेवभक्तांची संख्या दरवर्षी वाढतेयदरवर्षी होणारा गर्दीचा उच्चांक पाहता प्रशासनाच्यावतीने राष्टÑसंत तुकडोजी महाराजांच्या गुरूदेव भक्तांची गैरसोय टाळण्यासाठी जागा अधिग्रहित करणे गरजेचे झाले, असून या ठिकाणी गर्दीचा उच्चांक नित्यनेमाने वाढतच चालेला आहे. भविष्यात चेंगराचेंगरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने वेळीच लक्ष घालून या दिशेने पावले उचलण गरजेचे झाले आहे.