मोबाईल क्रमांक जारी : एसएमएसवर वाहनांची माहिती लोकमत विशेषअमरावती : तुम्ही रस्त्याने चाललाय आणि एखादा भरधाव दुचाकीस्वार तुमच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पसार झाला तर घाबरू नका. प्रसंगावधान राखत त्या दुचाकीचा क्रमांक फक्त टीपा. पुढचे काम ७७३८२९९८९९ हा भ्रमणध्वनी क्रमांकच करेल. केंद्र शासनाच्या रस्ता, वाहतूक मंत्रालयाने जारी केलेल्या उपरोक्त क्रमांकावर चेनलिफ्टरचा वाहन क्रमांक पाठविला की क्षणार्धात तुम्हाला तुमच्या मोबाईलवर वाहन मालकाच्या नावासह इतरही माहिती उपलब्ध होणार आहे. सर्वसामान्य नागरिकांसह पोलिसांनाही शासनाची ही ‘एसएमएस’ सेवा लाभदायी ठरणार आहे. एखाद्या वाहनाची संपूर्ण माहिती मिळविणे सर्वसामान्यांसाठी आजवर महाकठिण काम होते. पोलिसांना सुध्दा यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाशी पत्रव्यवहार करावा लागत होता. मात्र, आता त्यावर शासनाने सुलभ पर्याय दिला आहे. ७७३८२९९८९९ या क्रमांकावर एसएमएस करून काही वेळातच वाहन मालकाचे नाव, गाडीचे मॉडेल तसेच गाडीची वैध मुदत आदींची माहिती एसएमएसद्वारे मिळू लागली आहे. शासकीय नियमानुसार कुठल्याही वाहनाची माहिती मिळविणे जिकरीचे काम होते, हे काम आता अत्यंत सुलभ झाले आहे. असा करा उपयोगकुठल्याही ठिकाणावरून उपरोक्त क्रमांकावर संदेश पाठविता येईल. पाठविणाऱ्याच्या क्रमांकाची विशेष शासकीय माहिती केंद्रात नोंद होईल. मोबाईल क्रमांकाची शहानिशा होऊन वाहन या वेबपोर्टलमध्ये उपलब्ध डाटाबेसमधून हव्या असणाऱ्या वाहनाची माहिती एसएमएसद्वारे प्राप्त होईल. यासर्व प्रक्रियेसाठी काही मिनिटांचा कालावधी लागेल. एसएमएसची सुलभ पद्धतश्अऌअठ स्पेस वाहन क्रमांक टाईप करून ७७३८२९९८९९ या क्रमांकावर पाठवायचा आहे. एसएमएस पाठविल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच तुम्हाला हवी असणारी माहिती उपलब्ध होणार आहे. संशयिताचा लागणार छडाएखादे भरधाव वाहन धडक देऊन निघून गेले, किंवा खूप दिवसांपासून एकाच ठिकाणी उभ्या असलेल्या संशयित वाहनाची माहिती सुद्धा क्षणार्धात मिळेल. शासनाने दिलेल्या या क्रमांकावर संबंधित वाहनाचा क्रमांक पाठविला की काही क्षणात त्या वाहनाची संपूर्ण माहिती मिळणार आहे.
अवघ्या मिनिटांत पटणार चेनलिफ्टर्सची ओळख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2016 00:12 IST