शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लॅन सांगितला
3
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
4
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
5
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
6
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
7
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
8
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
9
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
10
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
11
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
12
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
14
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
15
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
16
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
17
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
18
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
19
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
20
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...

दुबारच्या अहवालास कर्मचारी संपाची बाधा

By admin | Updated: July 13, 2017 00:11 IST

यंदाच्या खरीपात जिल्ह्यात झालेल्या साडेचार लाख हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी दीड लाख हेक्टरवर दुबार पेरणीची शक्यता असल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला.

अहवाल केव्हा? : दीड लाख हेक्टर क्षेत्रात पेरणीला मोड येण्याची शक्यतालोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या खरीपात जिल्ह्यात झालेल्या साडेचार लाख हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी दीड लाख हेक्टरवर दुबार पेरणीची शक्यता असल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला. शासनाने या विषयीचा अहवाल मागितला असताना क्षेत्रिय कर्मचारी संपावर असल्याने कृषी विभाग तोंडघसी पडला आहे. अद्याप जिल्ह्याचे नजरअंदाज बाधीत क्षेत्र अहवालच तयार नसल्याचे वास्तव आहे.कृषी विभागाचा सुधारीत आकृतीबंध तयार करण्यासोबतच इतरही प्रलंबीत मागण्यासाठी राज्य कृषी सहाय्यक संघटनेव्दारा १० जुलै पासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. जिल्ह्यात एक जून ते १२ जुलै दरम्यान अपेक्षित सरासरीच्या केवळ ५० टक्के प्रमाणात पाऊस पडला. परिणामी जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. अश्या परिस्थितीत गावागावातील कृषी सहाय्यक संपावर गेल्याने शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनात बाधा निर्माण झाली आहे. या आपातस्थितीचा आढावा घेण्यासाठी शासनव्दारा दुबार पेरणीचे संभाव्य क्षेत्राचा अहवाल मागविला असता क्षेत्रिय कर्मचारी संपावर असल्याने हा अहवालच तयार झाला नसल्याची माहिती समोर आली आहे. जिल्ह्यातील केवळ पाच तालुक्यांचे अहवाल पाठविण्यात आले आहे तर उर्वरीत नऊ तालुक्यातून हे अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयास अद्याप अप्राप्त आहेत. याबाबत तालुक्यांचा अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधला असता कृषी सहाय्यक संपावर असल्याने माहिती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. पावसाअभावी बिकट परिस्थिती उद्भवल्याने शासनाची यंत्रणाच बेपर्वा असल्याने शेतकऱ्यांना आता अस्मानी सोबत सुल्तानी संकटाचा सामना करावा लागत असल्याचे वास्तव आहे.सद्यस्थितीत ६५ टक्क्यावर क्षेत्रात पेरणीजिल्ह्यात यंदाच्या खरीपासाठी सात लाख २८ हजार हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी साडे चार लाख हेक्टर क्षेत्रात सद्यस्थितीत पेरणी झाली आहे. यामध्ये चांदुररेल्वे तालुक्यात ३६,२३८ हेक्टर, तिवसा ३५ हजार ११३, मोर्शी ४३,१२०, वरूड ३५ हजार ९६७, दर्यापूर १६, ५३१, धारणी ३८,५६२, चिखलदरा १०,०७५, अमरावती ५१,४७०, भातकुली ३६,४८१, नांदगाव खं.५२,७७०, अंजनगाव सुर्जी ३,९००, अचलपूर १५,६९४, चांदुरबाजार ४४,९५०, धामणगाव रेल्वे ३१,८५३ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली.असे आहे संभाव्य दुबार पेरणी क्षेत्रजिल्ह्यात दीड ते दोन लाख हेक्टर क्षेत्रात दुबार पेरणीचे सावट आहे. यामध्ये अमरावती तालुक्यात १५ ते १८ हजार हेक्टर, मोर्शी तालुक्यात १७ ते २० हजार हेक्टर, भातकुली तालुक्यात ११ ते १३ हजार हेक्टर, चांदुरबाजार तालुक्यात ३३ ते ३५ हजार हेक्टर, धारणी तालुक्यात चार ते सहा हजार हेक्टर क्षेत्रात दुबार पेरणीची शक्यता आहे. उर्वरीत तालुक्यातील माहिती उपलब्ध नसली तरी पेरणीपैकी ५० ते ६० टक्के क्षेत्रात दुबार पेरणीचे संकट कायम आहे. पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजा असला तरी हुलकावणीशिवाय काही नाही हे खरे आहे.पावसाचा ताण असल्यामुळे जिल्ह्यात किमान ६० ते ७० हजार हेक्टर संभाव्य दुबार पेरणीचे क्षेत्र असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. क्षेत्रीय कर्मचारी संपावर असल्याने काही प्रमाणात अडचण आहे. - अनिल खर्चान उपसंचालक, कृषी