शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

अमरावतीच्या अवकाशातून गेले आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 13:12 IST

मंगळवारी पहाटेच आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाचे अमरावती शहरावरून झालेले मार्गक्रमण पाहून अमरावतीकरांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.

ठळक मुद्देपहाटेचे विलोभनीय दृश्य मराठी विज्ञान परिषदेच्या माहितीवरून हजारोंनी केले निरीक्षण

वैभव बाबरेकरलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मंगळवारी पहाटेच आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाचे अमरावती शहरावरून झालेले मार्गक्रमण पाहून अमरावतीकरांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. अनेक खगोलीय अभ्यासकांसह जिज्ञासूंनी पहाटे ४.३३ ते ४.४८ या वेळेत अवकाश स्थानकाच्या मार्गक्रमणाचा अनुभव घेतल्याची माहिती मराठी विज्ञान परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.मराठी विज्ञान परिषदेचे खगोलशास्त्र शाखाप्रमुख रवींद्र खराबे, प्रवीण गुल्हाने, सुशीलदत्त बागडे, रोहित कोठाळे व रवि कलाने यांनी व्हॉट्सअ‍ॅपद्वारे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक अमरावती शहरावरून जाणार असल्याची माहिती व्हायरल केली होती. त्या अनुषंगाने अनेक अमरावतीकरांनी घरूनच या दृश्याचे अवलोकन करून विलोभनीय दृश्याचा आनंद घेतला व ऐतिहासिक क्षणाला उपस्थिती दर्शविली. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक (स्पेस स्टेशन) बरेचदा अमरावती शहरावरून गेले आहे. मंगळवारी पहाटे त्याची तेजस्विता वजा २.२५ (अधिक) असल्यामुळे ते साध्या डोळ्यांनी सहज दिसले. या स्पेस स्टेशनने २५ जून रोजी पहाटे ४ वाजून ४३ मिनिटे ५ सेकंदाने नैऋत्येकडून अमरावतीच्या अवकाशात प्रवेश केला आणि ४ वाजून ४८ मिनिटे ३६ सेकंटाला ईशान्येकडे याचा प्रवास संपला. तब्बल साडेपाच मिनिटे हे अवकाश स्थानक अमरावतीकरांना पाहता आले. या दिवशीचा हा प्रवास सरासरी ४१५ कि.मी.उंचीवरून झाला. यावेळी अवकाश स्थानकाची गती ७.६६ किमी प्रतिसेकंद अशी प्रचंड होती. अमरावती शहरावरून ते जात असताना एखाद्या ठळक ताºयाप्रमाणे दिसल्याची माहिती खगोलशास्त्र विभागप्रमुख रवींद्र खराबे यांनी दिली.पृथ्वीभोवती २४ तासांत १५.५२ फे ऱ्या आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक २४ तासांत पृथ्वीभोवती १५.५२ फे ऱ्या  घालते. त्यामुळे या ठिकाणावरून दर ४५ मिनिटाला एक याप्रमाणे २४ तासांत १५ वेळा सूर्याेदय व सूर्यास्त पाहता येतात. या अवकाश स्थानकाच्या प्रकल्पात अमेरिका, रशिया, जपान, कॅनडा, इटली व युरोप खंडातील काही देश असे एकूण १५ देश सहभागी आहेत. २० नोव्हेंबर १९९८ पासून या अवकाश स्थानकाच्या जोडणीचे काम सुरू करण्यात आले आहे.असाध्य आजारांवरील औषधाचे संशोधनपृथ्वीवर गुरुत्वाकर्षण व वातावरणाचा दाब असल्यामुळे सूक्ष्म प्रयोगाचे निष्कर्ष मिळविण्यात अडथळा येतो. त्यामुळे अशा अवकाश स्थानकामध्ये शून्य गुरुत्वार्षणाच्या स्थितीत प्रयोग केले जातात. एड्स, डायबिटीज, कर्करोग, एन्फ्ल्यूऐंजा अशा असाध्य आजारांवर औषधी शोधण्याकरिता तसेच विविध समस्यांवरील प्रयोग या अवकाश स्थानकात संशोधक करीत असल्याची माहिती खराबे यांनी दिली.

टॅग्स :scienceविज्ञान