शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेल"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
2
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
3
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
4
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
5
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
6
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
7
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
8
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
9
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
10
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
11
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
12
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
13
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
14
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
15
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
16
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
17
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
18
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
19
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
20
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'

स्पायडर (कोळी) संशोधनावरील आंतरराष्ट्रीय परिषद

By admin | Updated: November 1, 2015 00:27 IST

श्री शिवाजी शिक्षण संस्थेद्वारा संचालित जे. डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालय दर्यापूर व इंडियन सोसायटी ...

पत्रपरिषद : १८ देशांतील ४४ आंतरराष्ट्रीय संशोधकांची उपस्थितीअमरावती : श्री शिवाजी शिक्षण संस्थेद्वारा संचालित जे. डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालय दर्यापूर व इंडियन सोसायटी आॅफ अ‍ॅरकनॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने १६ ते १९ नोव्हेंबरदरम्यान अमरावती येथे 'स्पायडर (कोळी) संशोधक' या विषयावर तिसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजक प्राचार्य संयोगिता देशमुख यांनी शनिवारी आयोजित पत्रपरिषदेत दिली.या परिषदेत १८ देशांतील ४४ आंतरराष्ट्रीय ख्यातिप्राप्त संशोधक आपले विचार मांडणार आहेत. १२५ संशोधकांचे स्पायडर विषयांचे संशोधन येथे सादर करण्यात येणार आहेत. भारतातील पहिल्या परिषदेचा मान जे. डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालयाला मिळाला आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अरूण शेळके तसेच इंडियन सोसायटी आॅफ अ‍ॅरक्नॉलॉजीचे अध्यक्ष गणेश वानखडे यांच्या मार्गदर्शनात जे. डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालयाच्या प्राचार्य संयोगिता देशमुख व परिषदेचे समन्वयक अतुल बोडखे आयोजन करीत आहे. ही परिषद हॉटेल गौरी ईन येथे १६ ते १९ नोव्हेंबरदरम्यान होणार आहे. सृष्टीचक्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या कोळी संशोधनाबाबत पहिली आंतरराष्ट्रीय परिषद लाओस येथे संपन्न झाली. दुसरी चांगमई (थायलंड) येथे पार पडली. या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदचे आयोजन करण्याचा बहुमान भारताला प्राप्त झाला. महाविद्यालयातील कोळी संशोधन कार्याची दखल घेऊन जे. डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालयाला आयोजनाकरिता निवडण्यात आले. इंडियन सायन्स काँग्रेस, श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, श्री शिवाजी कृषी महाविद्यालय अमरावती, डी. एस. टी. दिल्ली, विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी, सातपुडा फाऊंडेशन, एशियन सोसायटी आॅफ अ‍ॅरक्नॉलॉजी, इंन्सा यांच्या सहकार्याने ही परिषद होणार आहे. पेक्का लॅटनीन (फिनलँड), मेटजाझ कुंटनर (स्लोवेनिया), इंगी अ‍ॅगनरसन (अमेरिका), युरी मास्त्रसिक (रशिया), पिटर एगर (जर्मनी) भारतातील इंग्लंडचे राजदूत सायमन हॉज, भारतातील सिंगापूरचे राजदूत डॉ. कोह, डॉ. सुरेश बेंजामीन (श्रीलंका) इत्यादी विदेशातील संशोधक तसेच भारतातील इंडियन सायन्स काँग्रेसचे अध्यक्ष ए. के. सक्सेना, बीएनएचएसचे संचालक दीपक आपटे, सीआयएफईचे उपकुलगुरु असिम पाल, मनोज चक्रवर्ती (एक्जीकेटीव्ह मेंबर, इंडियन सायन्स काँग्रेस), विजयालक्ष्मी सक्सेना (एक्जीकेटीव्ह मेंबर, इंडियन सायन्स काँग्रेस), निवेदिता चक्रवर्ती (एक्जीकेटीव्ह मेंबर, इंडियन सायन्स काँग्रेस), डॉ. गणेश वानखडे, डॉ. किशोर रिठे आदी जगप्रसिद्ध संशोधकांची उपस्थिती या परिषदेत राहणार आहे. कोळी संवर्धनाची शेतीतील उपयुक्तता, कोळीचे मानवी जीवनातील महत्त्व आदी विषयांवर मेळघाटातसुद्धा एक दिवसीय परिषदेचा अंतर्भाव या परिषदेत केला आहे. उपाध्यक्ष सुरेश ठाकरे, सचिव वि. गो. भांबुरकर, प्राचार्य संयोगिता देशमुख, स्थानिय व्यवस्थापन समिती सदस्य दिनकर गायगोले, समन्वयक अतुल बोडखे, इंडियन सोसायटी आॅफ अ‍ॅरक्नॉलॉजीचे सर्व पदाधिकारी, महेश चिखले, नेहा भटकर, प्रियंका हाडोळे, गजानन संतापे, सावन देशमुख, गजानन वाघ, जयंत वडतकर, रीना लहरिया, दिनेश वानखेडे तसेच महाविद्यालयातील नरेंद्र माने, मिलिंद भिलपवार, राजेश उमाळे, श्रीपाद मंथेन, सुभाष कांबळे आदी कार्यरत आहेत. (प्रतिनिधी)