महात्मा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हारार्पण करून अभिवादन करण्यात आले. दलितमित्र श्रीकृष्ण बनसोड यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन पार पडले. त्यांनी निद्रिस्त समाजात नवीन चेतना, नवा आत्मविश्वास निर्माण करून त्यांच्यात माणूस म्हणून जगण्याचा हक्काची जाणीव करून दिली. आजच्या विषमताधिष्ठित समाजव्यवस्थेतून बाहेर पडण्यासाठी त्यांची प्रबोधनाची चळवळ गतिशील करण्याची गरज बनसोड यांनी यावेळी व्यक्त केली. यामध्ये बबनराव बेलसरे यांनी अंधश्रद्धा निर्मूलनावर, अभियंता आशुतोष पाटील यांनी मानवमुक्तीचा लढा, रामनारायण चव्हाण यांनी क्रांतीकार्य, रामचरण माने यांनी फुलेंचे मानवतावादी विचार, प्रतिमा परदेशी यांनी स्त्रीमुक्ती चळवळ, शालिकराम भुसारी, अविनाश पाटील आदींनी फुलेच्या विविध कार्यप्रसंगावर प्रकाश टाकला. अरुण बुटले, वैशाली धाकुलकर यांनी स्वागतगीत सादर केले. प्रभाकर वानखडे यांनी सूत्रसंचालन तर प्रवीण खांडवे यांनी आभार प्रदर्शन केले.
महात्मा फुलेंच्या तत्त्वज्ञानावर आंतरराष्ट्रीय परिषद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:11 IST