शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाची तीव्रता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 23:36 IST

तीन दिवसांपासून शासन अंत पाहत आहे. मात्र, आमच्या एकीचा वज्रनिर्धार कायम आहे. सोबत आता कुटुंबीयही रस्त्यावर आल्याने आमची ताकद कैकपटींनी वाढली.

ठळक मुद्देप्रशासनाविरूद्ध रोष : जनआक्रोश आंदोलन राहुटीत रूपांतरित, तिसरी रात्रही रस्त्यावर; विभागीय आयुक्तांचा सचिवांशी संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : तीन दिवसांपासून शासन अंत पाहत आहे. मात्र, आमच्या एकीचा वज्रनिर्धार कायम आहे. सोबत आता कुटुंबीयही रस्त्यावर आल्याने आमची ताकद कैकपटींनी वाढली. आम्ही सर्व इथे असल्याने गुराढोरांकडे दुर्लक्ष आहे. त्यांनाही येथे बांधू; मात्र आता आंदोलनातून माघार घेणार नाही. ही आरपारची लढाई आहे. गुरुवारपासून हा लढा आणखी तीव्र करण्याचा निर्धार प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केला.विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समितीद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाची धग तिसऱ्या दिवशीही कायम आहे.कुटुंबीयही सोबतीलाआंदोलनात आता प्रकल्पग्रस्तांचे कुुटुंबीयदेखील सहभागी झाले आहेत. गुरुवारपासून घरची गुरेही या ठिकाणी आणायची तयारी सुरू केल्याने आंदोलनाची तीव्रता अणखीनही वाढणार आहे. दरम्यान, दुसºया दिवसाची रात्रही प्रकल्पगस्तांनी उघड्यावर काढली. प्रशासनाद्वारा जिल्हास्तरावरच्या मागण्या सोडविण्यातच वेळ घालविला जात आहे.जिल्हाधिकारी शैलेश नवाल बुधवारी सकाळी रूजू झाले. त्यांनी आंदोलकांची भूमिका समजून घेतली अन् दुपारी राज्य निवडणूक आयोगाच्या तीन दिवसांच्या प्रशिक्षणासाठी पुण्याला रवाना झाले. ते आता सोमवारीच जिल्ह्यात दाखल होेणार असल्याने आपसूकच या प्रकरणाची सूत्रे आता भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी व अजय लहाने यांच्याकडे आली आहेत. दरम्यान, विभागीय आयुक्तांनी जिल्हा प्रशासनाशी व आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. पालकमंत्र्यांनीदेखील जलसंपदा मंत्र्यांकडे शिष्टार्ई केली. मात्र, तोडगा आंदोलनकर्त्यांना मान्य नाही तसेच आंदोलनाची माघार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले. आंदोलन सुरूच असताना आमच्यातील काहीशी शासनाने व्हिसीद्वारे संवाद साधावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. दरम्यान रात्री १०.३० च्या सुमारास आंदोलन स्थळालगत एका कारला आग लागली असता आंदोलनकर्त्यांनी कॅनमधील पिण्याचे पाणी टाकून आग विझविली.गाडगेनगर ठाण्यात ५४ आंदोलकांविरुद्ध गुन्हाविदर्भ बळिराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समितीच्या एकूण ५४ आंदोलनकर्त्यांविरुध्द गाडगेनगर पोलिसांनी मंगळवारी गुन्हा नोंदविला. प्रकल्पग्रस्तांनी आपल्या मागण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडून रहदारीस अडथळा निर्माण केला तसेच सामान्य जनतेच्या अधिकाराचे हनन करून तणाव निर्माण केल्याचे पोलीस तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी भादंविचे कलम १४३, ३४१, १८८, सहकलम १३५, सहकलम ७, क्रिमीनल अमेंटमेंट अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे.दात्यांचा ओघ सुरूसोमवारपासून दिवसा उन्ह अन् रात्री थंडी अंगावर झेलत आंदोलनकर्ते जिल्हा कचेरीसमोर ठिय्या देऊन आहेत. त्यांच्या मदतीला आता दातेदेखील समोर येत आहेत. आंदोलकांच्या जेवणासाठी मदतीचे हात समोर आले आहेत. ठिय्याच्या ठिकाणीच आंदोलक महिलांद्वारे भाजीपाला निवडून सामूहिकरीत्या स्वयंपाक केला जात आहे. तिथेच जेवण झाल्यावर पुन्हा ठिय्या आंदोलनात सहभागी होत असल्याचे दिसून आले.अमरावतीकरांनी व्हावे सहभागीअमरावतीकरांना आज जे पाणी मिळत आहे, त्या अप्पर वर्धा प्रकल्पासाठी आमच्या जमिनी अधिग्रहीत झालेल्या आहेत. शासनाच्या दुटप्पी भूमिकेमुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली. १९७६ सालच्या अप्पर वर्धाच्या प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळालेला नाही. त्यामुळे अमरावतीकरांनीही या आंदोलनात सहभागी होऊन आमचा उत्साह वाढवावा, असे आवाहन वृद्ध प्रकल्पग्रस्तांनी केले.आंदोलकांशी संवाद साधण्यात येऊन आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली. याबाबत जलसंपदा सचिवांशी संवाद झाला. येत्या कॅबिनेट बैठकीच्या दिवशी बैठकीसाठी तारीख निश्चित करण्यात आली. तसे पत्र दिले आहे.- पीयूष सिंहविभागीय आयुक्तशासन बैठकीसंदर्भात अधिकृत पत्र आम्हाला प्राप्त नाही. पालकमंत्र्याच्या पत्रावर बैठकीची तारीख नाही. त्यामुळे आम्ही विश्वास ठेवू शकत नाही. आता आंदोलकांचा रोष वाढत आहे. उद्रेक कसा होईल, हे सांगता येत नाही.- मनोज चव्हाणअध्यक्ष, कृती संघर्ष समिती