शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
2
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
3
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
4
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
5
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
6
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
7
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
8
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
9
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
10
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
13
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
14
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
15
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
16
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
17
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
18
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
19
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
20
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)

‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’साठी तालुके दत्तक घेण्याचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 22:20 IST

जिल्ह्यातील पाणी पातळी खोलवर गेल्यामुळे रेनवॉटर हार्वेस्टिंग विषयी जनजागृती करण्यासाठी प्रत्येक विभागप्रमुखांनी जिल्ह्यातील तालुके दत्तक घ्यावे. तेथील पाण्याची पातळी वाढण्यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे सोमवारी मुख्यकार्यपालन अधिकारी मनीषा खत्री यांना पत्राव्दारे दिले आहेत.

ठळक मुद्देअध्यक्षांचे सीईओंना पत्र : भूजल पुनर्भरणाची खातेप्रमुखांवर जबाबदारी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील पाणी पातळी खोलवर गेल्यामुळे रेनवॉटर हार्वेस्टिंग विषयी जनजागृती करण्यासाठी प्रत्येक विभागप्रमुखांनी जिल्ह्यातील तालुके दत्तक घ्यावे. तेथील पाण्याची पातळी वाढण्यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे सोमवारी मुख्यकार्यपालन अधिकारी मनीषा खत्री यांना पत्राव्दारे दिले आहेत.जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतींसह जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील सर्व शासकीय इमारती, जिल्हा परिषद शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच नवीन घरकुल इमारतींना रेनवॉटर हार्वेस्टिंग करण्याचे दृष्टीने लक्ष देण्याची सूचनाही अध्यक्षांनी सर्व खातेप्रमुखांना दिल्या आहेत. जिल्ह्यात काही वर्षांपासून सातत्याने शेतकरी व नागरिकांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. अशातच पिण्याच्या पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात भासत असल्याने यंदाही अनेक गावांत पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावे लागत आहे. शासन व प्रशासनाकडून जिल्हाभरात पाणीटंचाई निवारणार्थ बऱ्याच गावात टँकर, विहीर अधिग्रहणाव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे. परिणामी पाण्याचे गंभीर संकट लक्षात घेता भविष्यात पाणीटंचाई निवारण्याच्या दृष्टीने पावसाच्या दिवसांत रेनवॉटर हार्वेस्टिंगसारखे उपक्रम राबविणे गरजेचे आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेने पाऊल उचलले आहे. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील सर्व शासकीय इमारतींना रेनवॉटर हार्वेस्टिंग करणे व नागरिकांमध्ये याबाबत जनजागृती करून त्याचे महत्त्व व भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून या कामाला प्राधान्य द्यावे, अशा सूचनाही अध्यक्षांनी मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत प्रशासकीय यंत्रणेला दिल्या आहेत.जलव्यवस्थापन समितीत होणार चर्चाजिल्हा परिषदेच्या आगामी जलव्यवस्थापन समितीच्या सभेत रेन वॉटर हार्वेस्टिकचा मुद्दा मांडला जाणार आहे. पावसाचे पाणी जमिनीत जिरविण्याच्या दृष्टीने रेनवॉटर हार्वेस्टिंगसारखे उपक्रम प्रभावीपणे राबविणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने आगामी जलव्यवस्थापन समितीच्या सभेत हे मुद्दे मांडले जाणार आहेत.जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील सर्व इमारतींवर रेनवॉटर हार्वेस्टिंग करणे आवश्यक आहे. सोबतच जनतेत याची जनजागृती व्हावी, यासाठी सर्व विभागप्रमुखांना पंचायत समिती दत्तक देण्याबाबत सीईओंना पत्राव्दारे कळविले आहे.- नितीन गोंडाणे,अध्यक्ष, जिल्हा परिषद