शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक ओळखपत्राऐवजी आधारकार्ड

By admin | Updated: February 2, 2015 22:57 IST

ज्येष्ठ नागरिकांना असणारी एसटी प्रवास सवलत यापुढे निवडणूक ओळखपत्राऐवजी आधारकार्डावर मिळणार आहे. याविषयीचे धोरण स्पष्ट करीत महामंडळाने जिल्ह्यातील सर्व

ज्येष्ठ नागरिक सवलत : परिवहन महामंडळाने बदलले धोरणअमरावती : ज्येष्ठ नागरिकांना असणारी एसटी प्रवास सवलत यापुढे निवडणूक ओळखपत्राऐवजी आधारकार्डावर मिळणार आहे. याविषयीचे धोरण स्पष्ट करीत महामंडळाने जिल्ह्यातील सर्व आगारप्रमुखांना आदेश निर्गमित केले आहे.महामंडळाचे राज्यात असणाऱ्या १८३ पेक्षा केवळ २० डेपो नफ्यात आहेत. महामंडळाला मागील वर्षात १२०० कोटींचा तोटा सहन करावा लागला. केंद्र सरकार वाहतूक व्यवस्थेविषयी नव्याने कायदा करुन खाजगी बसेसला प्रवासी वाहतुकीचे परवाने खुले करणार आहे. राज्य सरकार मात्र याविषयीचा कुठलाही कायदा करणार नसल्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी स्पष्ट निर्देश दिले आहे. आतापर्यंत राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेसमध्ये मतदार ओळखपत्रावर प्रवास सवलत दिली जात होती. मात्र यापुढे आधारकार्डाच्या आधारे ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे. (प्रतिनिधी)महामंडळाचा चेहरामोहरा बदलणारबसस्थानक परिसरात खाजगी वाहने येऊ नयेत यासाठी सर्व आगारात स्वयंचलीत गेट लावण्यात येणार आहे. सर्व एसटी डेपो पंचतारांकित करण्यात येणार आहे. प्रसाधान गृह आधुनिकतेचा वापर केला जाणार आहे. १० ते १४ वर्षांच्या विद्यार्थिनींना एसटीच्या मागच्या दरवाजाने प्रवेश देण्यात येऊन शेवटचे आसन त्यांच्यासाठी राखीव राहणार आहे. अपंगांसोबत एका सहकाऱ्याला असणारी विनातिकीट प्रवास करण्याची सवलत बंद करण्यात येणार आहे.