शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती शिवाजी महाराज, संभाजीराजेंची प्रेरणा घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 22:59 IST

रयतेचे राज्य यावे, यासाठी आयुष्य वेचणारे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे यांची प्रेरणा घेऊन आई-वडिलांचे ऋण फेडा,...

ठळक मुद्देयशवंत गोसावी : श्री शिवशाही महोत्सवाची थाटात सांगता

आॅनलाईन लोकमतअमरावती : रयतेचे राज्य यावे, यासाठी आयुष्य वेचणारे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे यांची प्रेरणा घेऊन आई-वडिलांचे ऋण फेडा, असे कळकळीचे आवाहन पुणे येथील शिवचरित्रकार यशवंत गोसावी यांनी शुक्रवारी येथे केले.स्थानिक रुख्मिणी सामाजिक विकास बहुउद्देशीय मंडळ आणि शिव सह्याद्री प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात दोनदिवसीय श्री शिवशाही महोत्सवाच्या सांगता कार्यक्रमप्रसंगी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून खा. आनंदराव अडसूळ, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके, नगरसेवक दिनेश बूब, प्रणीत सोनी, चेतन गावंडे, अर्चना धामणे, भैया पवार, अरविंद गावंडे, प्रवीण तायडे, भूषण फरतोडे आदी उपस्थित होते.यशवंत गोसावी पुढे म्हणाले, छत्रपती संभाजीराजे यांचा इतिहास विलासी प्रवृती, रंगेल असा वेगळा मांडला गेला. छत्रपती संभाजीराजे नेमके कसे होते, हे युवा पिढीला कधी कळू शकलेच नाही. त्यामुळे संभाजींचा खरा इतिहास जाणून घ्यायचा असेल, तर औरंगजेबाचा इतिहास वाचा. मुघलांना थरकाप आणणारे असे संभाजीराजे होते. अतिशय पराक्रमी, शूर असे ते होते. संभाजीराजांनी अवघ्या २४ व्या वर्षी औरंगजेबाला सळो की पळो करून सोडले. हा खरा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजीराजे यांच्या पराक्रमांची गाथा मांडताना गोसावी यांनी सध्याच्या सामाजिक, शैक्षणिक वाटचालीकडे लक्ष वेधले. शिवाजी महाराज, संभाजीराजे यांचे शौर्य, पराक्रमाचा आलेख मांडताना, आपणही या समाजाचे काही तरी देणं लागतो, ही भावना त्यांनी उपस्थितांच्या मनात रुजवली. मुलांना शिकवा - कलेक्टर, अधिकारी बनवा. थोरांचे विचार आत्मसात करून मुलांना आई-वडिलांची सेवा, आदर करण्याची शिकवण द्या, असे आवाहन त्यांनी केले. मुलांचे हट्ट, लाड पुरवा, पण त्यांच्या मनात वाईट प्रवृतीचा शिरकाव होणार नाही, याची काळजी घ्या. एकवेळी शिवाजी, संभाजीचा आदर करू नका, पण आई-वडिलांचा आदर करा, असे भावनिक आवाहन त्यांनी तरुणाईला केले. श्री शिवशाही महोत्सवातून खºया अर्थाने सामाजिक प्रबोधन होत असल्याची भावनादेखील यशवंत गोसावी यांनी व्यक्त केली. प्रास्ताविक आयोजक भूषण फरतोडे यांनी केले. संचालन क्षीप्रा मानकर यांनी केले. राष्ट्रवंदनेने सांगता झाली.