शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

अध्यापनाच्या मूल्यवर्धनासाठी प्रेरणादायी उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 23:07 IST

विविध जिल्ह्यांतून येणाऱ्या शिक्षकांनी अध्यापनाच्या मूल्यवर्धनासाठी प्रेरणा घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे शिक्षण व बांधकाम सभापती जयंत देशमुख यांनी केले.

ठळक मुद्देजयंत देशमुख : ‘शिक्षणाच्या वारी’ला सुरुवात

आॅनलाईन लोकमतअमरावती : विविध जिल्ह्यांतून येणाऱ्या शिक्षकांनी अध्यापनाच्या मूल्यवर्धनासाठी प्रेरणा घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे शिक्षण व बांधकाम सभापती जयंत देशमुख यांनी केले. ते शुक्रवारी शिक्षणाची वारी या कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना बोलत होते.शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी तसेच विद्यार्थ्यांची जलद गतीने प्रगती व्हावी, यासाठी शिक्षण विभागाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्या अनुषंगाने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत शिक्षणाची वारी या उपक्रमाला १५ डिसेंबर रोजी येथील श्री शिवाजी शारीरिक महाविद्यालयाच्या मैदानावर प्रारंभ झाला. यावेळी व्यासपीठावर प्राची साठे, सुनील मगर, सीईओ किरण कुलकर्णी, शिक्षण उपसंचालक चंदनसिंह राठोड, रवींद्र आंबेकर, सिद्धेश वाडकर, सुभाष कांबळे, पिराजी पाटील, हेमंत पवार, आर.डी तुरणकर व अन्य मान्यवर उपस्थित होते. शालेय शिक्षण विभागद्वारा शैक्षणिक विचारांची उपयोगिता व परिणामकारकता यांच्या आदानप्रदानासाठी शिक्षण वारीतून बोध घेऊन त्याचे अनुकरण करण्याचे आवाहनदेखील देशमुख यांनी केले. यावेळी उपस्थितांनी मनोगत मांडले. वारीत ५३ स्टॉल लावले आहेत. शिक्षणाच्या वारीमध्ये शैक्षणिक साहित्य, गुणवता विकासाचे प्रयोग यांची मांडणी करण्यात आली आहे. राज्यात काही शाळांमधील शिक्षकांनी लोकसहभागातून टॅब उपलब्ध करून विद्यार्थ्याच्या गुणवत्तेसाठी हातभार लावण्याचा प्रयन्न केला आहे. वारीतून शिक्षकांनाही नवीन शिकता यावे, त्याना शैक्षणिक गुणवता उंचावण्यासाठी प्रेरणा मिळावी, हा आयोजनामागील उद्देश आहे.