शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

वनक्षेत्रातील पाणवठ्यांची लिटमस पेपरने तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 05:00 IST

नैसर्गिक जलस्रोत कमी झाल्याने कृत्रिम पाणवठ्यांमध्ये पाणी भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. सावधगिरीचा उपाय म्हणून नियमित पाणवठे स्वच्छ केल्यानंतर त्यामध्ये टॅँकरद्वारे पाणी भरले जाते. यानंतर पाणवठ्यातील पाण्याची लिटमस पेपरने दरदिवसा तपासणी केली जाते. विष किंवा युरियासारखे रासायनिक पदार्थ पाण्यात टाकल्यास वन्यप्राण्यांच्या जिवाला धोका होऊ शकतो.

ठळक मुद्देविषप्रयोग टाळण्याची दक्षता : वडाळी आणि चांदूर रेल्वे वनविभागाची उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्कपोहरा बंदी : उन्हाळ््यात पाणीपातळी खालावत असल्यामुळे नैसर्गिक जलस्रोत आटतात. अशाप्रसंगी वन्यप्राण्यांना काहीच न आटणारे नैसर्गिक जलस्रोत आणि बहुतांश कृत्रिम पाणठ्यांवर अवलंबून राहावे लागते. या पाणवठ्यांवर विषप्रयोग होऊ शकतो, या शक्यता लक्षात घेऊन दररोज लिटमस पेपरने वनकर्मचाऱ्यांकडून तपासणी केली जात आहे.नैसर्गिक जलस्रोत कमी झाल्याने कृत्रिम पाणवठ्यांमध्ये पाणी भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. सावधगिरीचा उपाय म्हणून नियमित पाणवठे स्वच्छ केल्यानंतर त्यामध्ये टॅँकरद्वारे पाणी भरले जाते. यानंतर पाणवठ्यातील पाण्याची लिटमस पेपरने दरदिवसा तपासणी केली जाते. विष किंवा युरियासारखे रासायनिक पदार्थ पाण्यात टाकल्यास वन्यप्राण्यांच्या जिवाला धोका होऊ शकतो. हा धोका टाळण्याकरिता वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास भुंबर आणि चांदुर रेल्वे वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे यांनी आपआपल्या वर्तुळातील वनकर्मचाऱ्यांना पाणवठ्यांची नियमित, काटेकोर तपासणी करण्याच्या सूचना वनकर्मचाºयांना दिल्या आहेत.वडाळी, चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रात वनविभागाची सावधागिरीगुलाबी रंगाचा असलेला लिटमस पेपर पाण्यात टाकल्यास, विषाक्त पाण्यात पेपर निळ््या रंगाचा होतो. परंतु, जर पाण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विषप्रयोग केलेला नसल्यास गुलाबी रंगाचा लिटमस पेपर तपासणीदरम्यान गुलाबीच राहतो. यावरू न युरिया किंवा कुठलाही विषप्रयोग केला असल्यास वनकर्मचाऱ्यांना माहिती होते. वन्यप्रण्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने लिटमस पेपरने आता दरदिवसा पाणवठ्यांची तपासणी केली जात आहे.वडाळी वर्तुळात चार कृत्रिम पाणवठे, पोहरा वर्तुळात दोन कृत्रिम पाणवठे, चिरोडी वर्तुळात दोन कृत्रिम पाणवठे, तर बडनेरा, माळेगाव, चांदूर रेल्वे वर्तुळात नैसर्गिक पाणवठ्यांची संख्या बरीच आहे. नैसर्गिक पाणवठ्यांमध्ये भर उन्हाळ््यात मुबलक पाणी उपलब्ध आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग