शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई विद्यापीठाकडून परीक्षा विभागाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 22:09 IST

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने परीक्षेसंदर्भात सुरू केलेल्या विविध उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी मुंबई विद्यापीठातील चार सदस्यीय चमुने भेट दिली. दरम्यान या चमुने परीक्षा प्रणाली, आॅनलाइन निकाल, संगणकीय कामकाजाची सविस्तर माहिती जाणून घेतली.

ठळक मुद्देचार सदस्यीय चमुची भेट : गोंधळ सावरण्यासाठी अभ्यास दौरा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने परीक्षेसंदर्भात सुरू केलेल्या विविध उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी मुंबई विद्यापीठातील चार सदस्यीय चमुने भेट दिली. दरम्यान या चमुने परीक्षा प्रणाली, आॅनलाइन निकाल, संगणकीय कामकाजाची सविस्तर माहिती जाणून घेतली.अमरावती विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख यांनी मुंबई विद्यापीठाच्या चमूला परीक्षा आणि निकालासंदर्भात माहिती दिली. मुंबई विद्यापीठात गतवर्षी परीक्षा आणि निकालात गोेंधळ उडाला होता. त्यावेळी कुलगुरूंना पायउतार व्हावे लागले होते. यापुढे अशी वेळ येऊ नये, यासाठी मुंबई विद्यापीठाने सावध पवित्रा उचलला आहे. मुंबई विद्यापीठाचे उपकुलसचिव फरडे यांच्या नेतृत्वातील चमुने अमरावती विद्यापीठाच्या परीेक्षा विभागात भेट देऊन येथील कामकाजाची माहिती जाणून घेतली. आयसीआर अंतर्गत परीक्षा विभागातील संगणक प्रणालीची माहिती नासीर खान यांनी या चमुला दिली. परीक्षा विभागात आॅनलाइन निकाल, मूल्यांकन, पुनर्मूल्यांकनासह चारही विभागाच्या उपकुलसचिवांसोबत या चमुने संवाद साधला. अमरावती विद्यापीठाने परीक्षेशी निगडित ‘एन्ड टू एन्ड’ कामे एजन्सीकडे सोपविली. त्यामुळे आॅनलाईन परीक्षा आणि निकाल हे अमरावती विद्यापीठाची आता जमेची बाजू ठरत आहे. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे तत्कालीन संचालक जयंत वडते यांच्या कार्यकाळात अमरावती विद्यापीठाने परीक्षेसंदर्भात प्रारंभ केलेल्या विविध उपक्रमांची मुंबई विद्यापीठाने दखल घेतल्यामुळे हा गौरव मानला जात आहे. मुंबई चमूत उपकुलसचिव फरडे यांचेसह सहायक मैयनुद्दीन शेख, सहायक कुलसचिव अशोक घुले, प्रभारी नियंत्रक राकेश तांबे यांचा समावेश होता.परीक्षा विभागाने हे राबविले उपक्रमपरीक्षा विभागाने आॅनलाईन वेळापत्रक, पूनर्मूल्यांकनासाठी सॉफ्टवेअर, आॅनलाईन एसएमएस, सीसीटीव्ही कॅमेरे, सारणी तक्त्यांचे डीजीटलायझेशन, गुणपत्रिका व पदवीप्रमाण पत्राचे आॅनलाइन प्रक्रियेद्वारे अपलोडींग, महाविद्यालय स्तरावर परीक्षा समन्वयक, उत्तर पत्रिकांचे बारकोड, परीक्षा केंद्रांना आॅनलाईन प्रश्नपत्रिका, विद्यार्थ्यांसाठी टोल फ्री क्रमांक, आचार्य पदवीकरिता नवीन अध्यादेश, पीएच.डी. पेट परीक्षेकरिता आॅनलाईन प्रक्रिया, विद्यार्थ्यांचे प्रवेश आणि परीक्षा अर्ज आॅनलाईन, परीक्षा विभागात गेट वे प्रणाली, केंद्रीय मूल्यांकन विभागात लिफ्टची सुविधा आदी उपक्रम राबविले आहे.मुंबई विद्यापीठाच्या चमुने परीक्षा विभागात तीन तास घालविले. परीक्षा आणि मूल्यमापनाबाबत राबविल्या जाणाऱ्या प्रत्येक विषयाची बारकाईने माहिती जाणून घेतली. हे विद्यापीठासाठी महत्त्वाचे ठरणारे आहे.- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, संत गाडगेबाबा विद्यापीठ, अमरावती