स्पेशल कोचने आगमन : सुधारणेबाबत महत्त्वाच्या सूचनाबडनेरा : मध्य रेल्वे भुसावळ विभागाचे प्रबंधक सुधीरकुमार गुप्ता यांनी शुक्रवार ३ जुलै रोजी बडनेरा व अमरावती रेल्वे स्थानकाची पाहणी केली. पाहणीदरम्यान खासकरुन पादचारी पुलाच्या गुळगुळीत टाईल्स तत्काळ बदलविण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्याला दिल्यात. रेल्वे प्रबंधक सुधीरकुमार गुप्ता नव्यानेच रुजू झाले आहेत. त्यानंतर त्यांचा बडनेरा व अमरावती रेल्वे स्थानकाचा हा पहिलाच पाहणी दौरा होता. प्रबंधक गुप्ता हे शुक्रवारी शालीमार एक्सपे्रसला स्पेशल कोच जोडून असणाऱ्या डब्याने बडनेऱ्यात ९.३० वाजता पोहोचले. दरम्यान त्यांनी रेल्वे स्थानकावरील पाण्याचे स्टँड, शौचालये, भोजनाय, रनिंगची पाहणी केली. अनेक वर्षांपासून जुन्या तिकीट पादचारी पुलाच्या गुळगुळीत स्टाईल्स प्रवाशांसाठी धोक्याच्या ठरत आहे. त्या टाईल्स तत्काळ बदलविण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्याला दिल्यात. या टाईल्सवरुन शेकडो प्रवासी घसरुन पडले आहेत. अनेकांना गंभीर इजा झाली आहे. त्याचबरोबर ज्या ठिकाणी आॅटो स्टॅन्ड आहे त्या जागेची पाहणी करण्यात आली. पाहणीदरम्यान आॅटो मिनिडोअर व शहर बसेस या परिसरात कुठेही उभे राहत असल्याचे चित्र त्यांना पाहायला मिळाले. लगेच मशीन, लोकोपायलट बुकींग कार्यालयाची पाहणी केली. यावेळी डीसीएम टी.टी. जाधव, वरिष्ठ अभियंता डी.के. गजभे, ए.एस. नरव्वी, कोटांगळे, वरिष्ठ तिकीट निरीक्षक वकील खान, रेल्वे सुरक्षा दलाचे आर.के.मीना, रेल्वेपथ निरीक्षक वाडेकर, खंडारेंसह इतरही कर्मचारी उपस्थित होते. एक तास बडनेरा रेल्वेस्थानकाची पाहणी करून ते अमरावती रेल्वेस्थानकाकडे रवाना झाले. (शहर प्रतिनिधी)
मध्यरेल्वे प्रबंधकांकडून बडनेरा, अमरावती स्थानकाची पाहणी
By admin | Updated: July 4, 2015 00:45 IST