लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : हवामानाच्या विविध धोक्यापासून फळपिकाच्या मृग बहराला संरक्षण मिळावे, यासाठी जिल्ह्यातील अधिसूचित मंडळात प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये संत्रा, मोसंबी डाळिंब, पेरू व चिकू या फळपिकांचा समावेश आहे. यासाठी त्या संबंधित मंडळात अधिसूचित पिकांचे २० हेक्टर उत्पादन असणे अनिवार्य आहे.कमी-जास्त पाऊस, पावसाचा खंड, व सापेक्ष आर्द्रता, या हवामान धोक्यापासून निर्धारित केलेल्या कालावधीत शेतकऱ्यांना विमा संरक्षण आणि आर्थिक सहाय्य देणे, हा योजनेचा उद्देश आहे. यामध्ये मंडळामध्ये असलेल्या महावेद प्रकल्पाच्या हवामान केंद्रावर नोंदविली गेलेली आकडेवारी व योजनेची प्रमाणके याची सांगड घालून संबंधित विमा कंपणीद्वारा नुकसान भरपाई शेतकऱ्यांना परपस्परच देय होणार आहे. या योजनेत संबंधित मंडळातील शेतकरी पात्र आहेत. तसेच विविध वित्तीय संस्थेकडून पीककर्ज घेणारे शेतकºयांना योजना सक्तीची, तर बिगर शेतकऱ्यांना ऐच्छिक स्वरूपाची योजना राहणार आहे. संत्र्याच्या मृग बहरासाठी १५ जून ते १५ जुलै या कालावधीत कमी पाऊस व १६ जुलै ते १५ आॅगस्ट या कालावधीत पावसाचा खंड हा विमा संरक्षित कालावधी आहे. या फळपिकांना विमा संरक्षित रकमेच्या ५ टक्के किंवा वास्तववादी दर यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम विमा हप्ता म्हणून भरावी लागणार आहे.मृग बहरासाठी अधिसूचित मंडळजिल्ह्यात संत्र्याच्या मृग बहरासाठी अमरावती, वडाळी, नवसारी, बडनेरा, नवसारी, डवरगाव, माहुली, नांदगाव पेठ, निंबा, चांदूर रेल्वे, पळसखेड, घुईखेड, आमला विश्वेश्वर सातेफळ, धामणगाव, चिंचोली, भातकुली, अंजनसिंगी, मंगरूळ दस्तगीर, दत्तापूर, तळेगाव, नांदगाव, दाभा, शिवणी रसुलापूर, मंगरूळ चव्हाळा, पापळ, लोणी, धाणोरा, माहुली चोर, अंबाडा, हिवरखेड, रिद्धपूर धामणगाव, नेरपिंगळाई, शिरखेड, मोर्शी, वरूड, बेनोडा, पुसला, वाठोडा लोणी, शे.घाट, राजुरा बाजार, तिवसा, मोझरी, वºहा, कुºहा, वरखेड, चांदूर बाजार, ब्राम्हणवाडा थडी, बेलोरा, करजगाव, शिरजगाव कस्बा, तळेगाव मोहणा, आसेगाव, अचलपूर रासेगाव, असतपूर, परसापूर, पथ्रोट, परतवाडा, चिखलदरा, सेमाडोह, टेब्रुसोडा, अंजणगाव, भंडारज, विहीगाव, सातेगाव, कापूसतळणी व कोकर्डा या मंडळांचा समावेश आहे.
संत्र्याच्या मृग बहराला विम्याचे कवच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 21:56 IST
हवामानाच्या विविध धोक्यापासून फळपिकाच्या मृग बहराला संरक्षण मिळावे, यासाठी जिल्ह्यातील अधिसूचित मंडळात प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे.
संत्र्याच्या मृग बहराला विम्याचे कवच
ठळक मुद्देप्रधानमंत्री पीक विमा योजना : मोसंबी, डाळिंब, पेरू, चिकू फळपिकांचा समावेश