शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

रेड्डींवरील आरोपांची चौकशी; टीम हरिसाल पोहोचली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:13 IST

लोकमत विशेष नरेंद्र जावरे परतवाडा (अमरावती) : हरिसाल वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्याप्रकरणात श्रीनिवास रेड्डींच्या भूमिकेची चौकशी करण्यासाठी ...

लोकमत विशेष

नरेंद्र जावरे

परतवाडा (अमरावती) : हरिसाल वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्याप्रकरणात श्रीनिवास रेड्डींच्या भूमिकेची चौकशी करण्यासाठी महिला आयपीएसच्या नेतृत्वातील पथक गुरुवारी रात्रीच हरिसाल येथे पोहोचले आहे.

आरोपी निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याच्या गैरकृत्यावर श्रीनिवास रेड्डी यांनी पांघरूण घातले. यासह अनेक प्रकारचे गंभीर आरोप करण्यात आले होते. या सर्व बाबींची तपासणी करण्यासाठी मुंबई येथील अपर पोलीस महासंचालक व सहव्यवस्थापकीय संचालक प्रज्ञा सरवदे यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानुसार ते चौकशी पथक गुरुवारी रात्री हरिसाल येथील निसर्ग संकुलात दाखल झाली. त्यांनी शुक्रवार व शनिवार वन कर्मचारी अधिकाऱ्यांचे बयाण नोंदविले, तर सोमवारी आयपीएस प्रज्ञा सरवदे येणार आहेत.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी शासकीय रिवॉल्वरने २५ मार्च रोजी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्यापूर्वी दिपाली यांनी आत्महत्येचे कारण चिठ्ठीमध्ये लिहून ठेवले होते. संपूर्ण महाराष्ट्रात या घटनेने खळबळ उडाली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौकशी आरंभली, सर्वत्र आक्रोश पाहता उघडण्याची गांभीर्य पाहून शासनाचे वरिष्ठ अधिकारी असलेल्य समित्यांमार्फत चौकशी सुरू केली आहे. त्यानुसारच मुख्य वनसंरक्षक अरविंद आपटे यांनी भापोसे

प्रज्ञा सरवदे यांची नियुक्ती केली होती. त्यांना ३० एप्रिलपर्यंत अहवाल द्यायचा आहे.

बॉक्स

श्रीनिवास रेड्डी वरील आरोपांची होणार चौकशी

तत्कालीन अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी यांच्यावर दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी अनेक प्रकारचे गंभीर आरोप आहेत. शिवकुमार याच्याकडून मानसिक छळ होत असल्याची बाब श्रीनिवास रेड्डी यांच्या निदर्शनास वेळोवेळी आणली होती. तरीदेखील रेड्डी यांनी आवश्यक ती दखल घेऊन उचित कारवाई न केल्याचा ठपका असल्यामुळे चौकशी आदेश देण्यात आले होते. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी विविध संघटनांनी केली होती. त्यामुळे रेड्डी हे दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरले का किंवा कसे, याबाबत सखोल चौकशी करण्यासाठी प्रज्ञा सरवदे सोमवारी हरिसाल येथे येणार आहेत.

बॉक्स

दीपालींच्या पतीचे बयान नोंदविणार

हरिसाल येथील निसर्ग निर्वाचन संकुलात पोहोचलेल्या चार सदस्य पोलीस अधिकाऱ्यांच्या चमूने शुक्रवार व शनिवारी चिखलदरा, हरिसाल व क्षेत्रीय व्याघ्रप्रकल्प व गुगामल वन्यजीव विभागातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांचे बयाण या चमूने नोंदविले. दीपाली चव्हाण यांच्या आईचे बयान आयपीएस प्रज्ञा सरवदे यांनी त्यांच्या सातारा येथे घरी जाऊन नोंदविल्याचे सूत्रांनी सांगितले, तर पती राजेश मोहिते यांचे बयाण सोमवारी नोंदविले जाणार आहे. त्यासोबतच काही संघटनांचे प्रतिनिधी, अधिकाऱ्यांचेही बयाण नोंदविले जाणार आहे.