शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणासाठी अचलपुरात राबविली अभिनव पद्धत; केंद्रावरील गर्दी टळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 16:43 IST

Coronavirus in Amravati कोरोना लस घेण्याकरिता केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे टोकन पद्धती राबविण्यात येत आहे. यात लस घेण्याकरिता केंद्रावर येणाऱ्या नागरिकांना फोनद्वारे लसीकरणाची हमी दिल्या जात आहे.

ठळक मुद्देनागरिकांना हमी मिळाली

अनिल कडू

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना लस घेण्याकरिता केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे टोकन पद्धती राबविण्यात येत आहे.यात लस घेण्याकरिता केंद्रावर येणाऱ्या नागरिकांना फोनद्वारे लसीकरणाची हमी दिल्या जात आहे. केंद्रावर लस उपलब्ध होताच दिवस, वेळ आणि तारीख वैद्यकीय यंत्रणेकडून त्यांना कळविल्या जात आहे. दिलेल्या दिवसावर नागरिक केंद्रावर येऊन लस घेत आहेत .

यातून लसीकरणा करिता केंद्रावर नागरिकांची होणारी गर्दी टळली आहे. नागरिकांना दिलासा मिळाला आहे. केंद्रावरील नागरिकांची रांग यातून नाहीशी झाली आहे.अचलपूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुरेंद्र ढोले यांच्या कल्पकतेतून ही टोकण पद्धती अमलात आली असून ती राबविल्या जात आहे. याकरिता त्यांनी साध्या पृष्ठांच्या चाळीस पेट्या तयार ठेवल्या आहेत. यातील काही पेटयांवर कोविशील्ड व काही पेटयांवर कोव्याकसीन या लसीची नावे लिहिली आहे. सोबतच लसीचा पहिला डोज, दुसरा डोज याविषयी माहिती पेटयांवर अंकित आहे.लस घेण्याकरिता उपजिल्हा रुग्णालयातील केंद्रावर प्रवेश घेतेवेळी दर्शनी भागात बाहेरच या पेट्या ठेवण्यात आल्या आहेत. या पेट्यांच्या बाजूला कोऱ्या कागदांचे तुकडेही ठेवले गेले आहेत. आलेले व येणारे नागरिक या कागदावर आपले नाव, मोबाईल नंबर व शक्य असल्यास आधार नंबर लिहून ती चिठ्ठी, डोज नुसार जी लस हवी असेल त्या पेटीत टाकून निघून जात आहेत.

दर तासाला या पेट्या उघडल्या जात आहेत. त्यातील चिठ्ठ्याची नोंद केंद्रावरील रजिस्टरला घेतल्या जात आहे. लागलीच आपली चिठ्ठी मिळाली.ती रुग्णालयातील रजिस्टरला नोंदल्या गेली. लस उपलब्ध झाल्यानंतर आपल्याला फोन द्वारे कळवून केंद्रावर लस घेण्याकरिता बोलावण्यात येईल. असे त्या चिठ्ठीतील मोबाईल नंबरवर आरोग्य यंत्रणेकडून कळविल्या जात आहे. यातून संबंधित नागरिकास आपली चिठ्ठी योग्य ठिकाणी सुरक्षित पोचली असल्याची व आता आपल्याला लस मिळणार असल्याची हमी दिली आहे.

केंद्रावर येणाऱ्यांची व आलेल्यांची संख्या पाहून ठेवल्या जाणाऱ्या पेट्यांची संख्या कमी अधिक केल्या जात आहे.आज अचलपूर उपजिल्हा रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर पहिल्या डोजकरीता अठराशे तर दुसऱ्या डोज करीता सहाशे लोक प्रतीक्षेत आहेत. केंद्रावर लस उपलब्ध होत नसल्यामुळे केवळ ज्यांचा लसीचा दुसरा डोज आहे अशांनाच दुसरा डोज घेण्याकरिता केंद्रावर बोलाविल्या जात आहे.या केंद्रावरील कोव्हॅक्सीन लस संपली आहे. अनेक लोक या लसीच्या प्रतीक्षेत आहेत.या केंद्रावर केवळ कोविशिल्डचाच दुसरा डोज दिल्या जात आहे. लसीकरणाचा पहिला डोज देने थांबविण्यात आले आहे. दरम्यान डॉ सुरेंद्र ढोले यांच्या अभिनव अशा टोकन पद्धतीतून केंद्रावरील गर्दी ओसरली आहे. ही टोकन पद्धती लक्षवेधक ठरली आहे

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस