शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

जखमी काळवीटला गोरेवाड्यात हलविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 23:51 IST

बडनेरा मार्गावरील काटआमलानजीक अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या एका नर काळवीटाला पुढील उपचारासाठी नागपूरच्या गोरेवाडा येथे हलविण्यात आले आहे.

ठळक मुद्देकाटआमला येथील अपघात : वसा संस्था, अमरावती वनविभागाची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बडनेरा मार्गावरील काटआमलानजीक अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या एका नर काळवीटाला पुढील उपचारासाठी नागपूरच्या गोरेवाडा येथे हलविण्यात आले आहे.बडनेरा रोडने जात असताना दोन काळवीट जखमी अवस्थेत रस्त्यावर दिनेश मालधुरे यांना आढळले. त्यांनी याची माहिती तत्त्काळ उत्तमसरा येथील वसा रेस्क्यू सेंटरला दिली. त्यानंतर वसाचे भूषण सायंके, निखिल फुटाणे व पंकज मालावे यांनी घटनास्थळी धाव घेतली. वन्यप्रेंमीने काळवीटची पाहणी केली असता एक काळवीट दगावल्याचे निदर्शनास आले, तर दुसरे गंभीर जखमी झाले होते. त्यांनी वनविभागाच्या शिकार प्रतिबंधक पथकाला याबाबत अवगत केले. मात्र, ते दुसऱ्या रेस्क्यूवर काम करीत असल्यामुळे वेळेवर पोहचू शकले नाही. वसाच्या रेस्क्युअरनी बडनेरा पोलीस ठाण्याचे विनोद आमले यांच्या मदतीने दोन्ही काळवीटला ताब्यात घेतले.काळवीटला बडनेरा पोलिसांच्या वाहनात टाकून वसा रेस्क्यू सेंटरवर आणण्यात आले. जखमी अवस्थेतील काळवीटवर शुभम सायंके आणि गणेश अकर्ते यांनी प्रथमोपचार केले. त्यानंतर शिवणी बिटमधील वनकर्मचाºयांनी पंचनामा केला. बडनेरा येथील पशुधन विकास अधिकारी इंगळे यांनी रेस्क्यू सेंटरवर येऊन जखमी काळवीटची पाहणी केली. मृत काळवीटचे शवविच्छेदन वनाधिकाºयांनी केले. जखमी काळवीटची प्रकृती नाजूक असल्यामुळे त्याला तातडीने नागपूर येथील गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये आणावे, यासाठी वसाने वनविभागाला अर्ज केला. परिस्थिती लक्षात घेत उपवनसंरक्षक हेमंत मीना यांनी जखमी काळवीटला नागपूरला हलवण्याच्या दिशेने पाऊल उचलले. चांदूर रेल्वेचे वनपरिक्षेत्र अधिकारी कोकाटे यांनी वाहन उपलब्ध करून देताच वनरक्षक वीरेंन उज्जेनकर, वनरक्षक हिवराळे, वाहन चालक पंचभाई समवेत वसाचे भूषण सायंके व निखिल फुटाणे हे नागपूरकरिता रवाना झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अमरावतीचे मानद वन्यजीव सरंक्षक विशाल बनसोड यांनी गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये फोनद्वारे योग्य माहिती पोहचवून काळवीटच्या उपचाराकरिता योग्य मदत उपलब्ध करून दिली.