शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

गुलाबी बोंडअळींचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 06:01 IST

कीटकनाशकाची फवारणी शक्यतो सकाळी व संध्याकाळी हवेच्या दिशेने करावी. संरक्षण किटशिवाय फवारणी करु नये, कीटकनाशकांची हाताळणी करताना सदैव जागृत राहावे, शेतकरी किंवा शेतमजुराने उपाशीपोटी फवारणी न करता न्याहारी करावी, सलग दिवस फवारणी करू नये, आजारी किंवा शरीराला जखम असल्यास अश्या व्यक्तीने फवारणी करू नये.

ठळक मुद्देकृषी विभाग : फेरोमेन ट्रॅप, लाईट ट्रॅप, निमअर्काची फवारणी आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मागील वर्षाच्या तुलनेत यंदा कपाशीच्या क्षेत्रात वाढ झालेली आहे. समाधानकारक पावसाने पिकाची वाढ होत आहे. पीक पात्या फुलोरावर असल्याने गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन करण्याकरिता प्रति हेक्टरी ५ फेरोमन ट्रॅपचा वापर करणे, लाईट ट्रॅप लावणे, निम अर्काची फवारणी करणे, वेळीच गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन व डोमकळी नष्ट करणे महत्वाचे असल्याची माहिती कृषी विकास अधिकाऱ्यांनी दिली.सद्यस्थितीत कपाशी पीक फुलोरा येण्याच्या अवस्थेत असून यंदा देखील कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तसेच काही भागात बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कृषी विभाग, प्रादेशिक संशोधन केंद्र व कृषी विज्ञान केंद्र आदीच्या मार्गदर्शनात उपाययोजना करणे महत्वाचे आहे.मागील वर्षी खरीप हंगामामध्ये जिल्ह्यामध्ये कीटकनाशके फवारणीमुळे शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा झाल्याचे दिसून आले. यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकरी, शेतमजुरांना फवारणीमुळे विषबाधा होवू नये याकरिता सावध राहून खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्याकरिता कीटकनाशके खरेदी करताना पिकावरील येणाऱ्या किडीकरिता शिफारशीत कीटकनाशकाची खरेदी परवानाधारक कृषी केंद्रातूनच करावी. कीटकनाशके खरेदीचे पक्के बिल घ्यावे, फवारणी करताना विषबाधा झाल्यास प्रथमोपचार करून ताबडतोब प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल होवून उपचार करून घ्यावा, कीटकनाशके फवारणी करताना कृषी विभागामार्फत तालुकास्तरीय व गावस्तरीय तसेच शेतीशाळेकडून होत असलेल्या मार्गदर्शनाचा फायदा घ्यावा. सर्व शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन जिल्हाधिकारी व कृषी विभागाद्वारा शेतकरी, शेतमजुरांना करण्यात येत आहे.फवारणी करताना खबरदारी आवश्यककीटकनाशकाची फवारणी शक्यतो सकाळी व संध्याकाळी हवेच्या दिशेने करावी. संरक्षण किटशिवाय फवारणी करु नये, कीटकनाशकांची हाताळणी करताना सदैव जागृत राहावे, शेतकरी किंवा शेतमजुराने उपाशीपोटी फवारणी न करता न्याहारी करावी, सलग दिवस फवारणी करू नये, आजारी किंवा शरीराला जखम असल्यास अश्या व्यक्तीने फवारणी करू नये. तसेच जे मजूर फक्त कीटकनाशके फवारणीचे काम करतात त्यांनी आरोग्य विभागाकडून नियमित तपासणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

टॅग्स :agricultureशेती