शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

वरूडमध्ये संत्र्यावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव

By admin | Updated: August 11, 2016 00:07 IST

बदलत्या वातावरणाने अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने विदर्भाच्या कॅलिफोर्नियातील संत्रा आंबिया बहाराला गळती लागल्याने...

आंबिया बहराला गळती : कृषी विभागाद्वारे व्हावे सर्वेक्षण वरुड : बदलत्या वातावरणाने अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने विदर्भाच्या कॅलिफोर्नियातील संत्रा आंबिया बहाराला गळती लागल्याने संत्रा उत्पादक शेतकरी पुन्हा चिंताग्रस्त झाले आहेत. संत्रा गळतीचे प्रमाण ५० टक्के असल्याने या संकटातून कसे सावरायचे? असा प्रश्न संत्रा उत्पादकांपुढे उभा ठाकला आहे. या नुकसानीचे सर्वेक्षण करून कृषी विभागाने तातडीच्या उपाययोजना सुचविण्याची मागणी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. तालुक्यात २१ हजार ५०० हेक्टर जमिनीत संत्रा झाडे आहेत. यापैकी २१ हजार ५०० हेक्टर जमिनीवर फळे देणारी संत्रा झाडे आहेत. संत्र्याचे दोन बहार संत्रा उत्पादक घेतात. यामध्यो आंबिया बहार जानेवारीमध्ये येतो तर दुसरा मृग बहार मृग नक्षत्रामध्ये निसर्गावर अवलंबून असतो. यावर्षी सुरुवातीपासून पावसाने दडी मारल्याने मृग बहाराचे संत्रा पीक आले नाही. मात्र, डिसेंबरपासून तापमानात वाढ झाल्याने तडी दिलेल्या संत्रा झाडावर आंबिया बहार चांगला फुलला होता. उन्हाळयात अतिउष्णतापमान असताना सुद्धा संत्रा उत्पादकांनी पाण्यासारखा पैसा खर्च करुन आंबिया बहार टिकविला. मात्र, अल्पशा पावसामुळे बुरशी, फायटोपथोरा तसेच देठतुटीसह अज्ञात रोगांनी थैमान घातल्याने संत्रा आंबिया बहाराला मोठ्या प्रमाणात गळती सुरु आहे. ओल्या दुष्काळामुळे संत्रा उत्पादकांच्या हातचे नगदी पीक जाण्याची शक्यता बळावली आहे. गळलेला संत्रा दिवसागणिक शेतकऱ्यांची चिंता वाढवित असल्याने यावर उपाययोजना सुचविण्याकरीता कृषी विभागाने सर्वेक्षण करावे, अशी मागणी संत्रा उत्पादकांनी केली आहे. संत्रा उत्पादन घेणाऱ्या पंढरी,सावंगी,गणेशपूर,जामठी,वरुड, सुरळी, आमनेर, एकदरा, झटामझिरी, पिंपळशेंडा, आंतरखोप, बहादा, वाई, राजुराबाजार, हातुर्णा, उदापूर, बेनोडा,बारगांव, जामगांव, बेनोडा, लोणी, जरुड, टेंभुरखेडा, गव्हाणकुंड, तिवसाघाट, शेंदूरजनाघाट, पुसला, लोहदरा, देऊतवाडा परिसरातील संत्रा बागांमधील आंबिया बहाराची मोठया प्रमाणात गळती सुरु असल्याने संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. अतिपावसामुळे अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने ५० टक्के आंबिया बहार गळाला आहे. शासनाने कृषी विभागाची पथके पाठवून रोगाचे कारण शोधून उपाय सुचविणे तसेच संकटात सापडलेल्या संत्रा उत्पादकांना मदत करणे गरजेचे आहे. अन्यथा मेटाकुटीस आलेला संत्रा उत्पादक पुन्हा कर्जबाजारी होण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांना सावरण्यासाठी तातडीने नुकसानभरपाई देण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)