शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठात इंडिया इंटरनॅशनल डान्स फेस्टिव्हल थाटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 22:01 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, आयआयडीएफ फाऊन्डर-सांस्कृतिकी, भुवनेभर व येथील कलाशिखर फाऊन्डेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठात मंगळवारी इंडिया इंटरनॅशनल डान्स फेस्टिव्हला थाटात प्रारंभ झाला. कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

ठळक मुद्देकुलगुरूंच्या हस्ते उद्घाटन : सांस्कृ तिक कार्यक्रमांनी जीवनात आनंद

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, आयआयडीएफ फाऊन्डर-सांस्कृतिकी, भुवनेभर व येथील कलाशिखर फाऊन्डेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठात मंगळवारी इंडिया इंटरनॅशनल डान्स फेस्टिव्हला थाटात प्रारंभ झाला. कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.मंचावर आयआयडीएफ सांस्कृतिकी, भुवनेश्वरचे महोत्सव निदेशक शामहरी चक्रा, कलाशिखर फाऊन्डेशनचे अध्यक्ष भैयासाहेब मेटकर, सचिव शीतल मेटकर, हेमंत नृत्य-कला मंदिराचे सचिव मोहन बोडे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक दिनेश सातंगे, रशियाच्या सुप्रसिद्धी ओडिसी नृत्यांगणा विटालीना लोबच, सोफया कुखारीनोक उपस्थित होत्या.वर्तमानकाळात प्रत्येकाच्या धकाधकीच्या जीवनामध्ये सुलभता, प्रसन्नता यावी आणि आनंद मिळावा, यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम महत्त्वाचे आहे. इंडिया इंटरनॅशनल डान्स फेस्टिव्हल सगळ्यांना आनंद देईल, असे मत कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी व्यक्त केले.विद्यापीठाचा घटक म्हणून आम्ही अशा कार्यक्रमाची वाट पाहत होते. चांगली मेजवानी, आनंद या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वांना मिळणार आहे. वातावरण बदलू शकते, असा हा कार्यक्रम आहे. आनंदी वातावरणात जगण्याची संधी या निमित्ताने सर्वांना प्राप्त झाली आहे. यापूर्वीसुद्धा विद्यापीठाने लोककला महोत्सव, आदिवासी नृत्य अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन केले. आंतरराष्ट्रीय दर्जाचा कार्यक्रम विद्यापीठात घेण्याची संधी आयोजकांनी दिल्याबद्दल सर्वांनी आभार व्यक्त केले.कार्यक्रमामध्ये वृक्ष व पुस्तक देऊन अतिथींचे स्वागत करण्यात आले. सुप्रसिद्ध ओडिसी नृत्यांगणा शीतल मेटकर यांनी प्रास्ताविक केले. संचालन क्षीप्रा मानकर यांनी केले. आभार शीतल मेटकर यांनी मानले. उद्घाटन कार्यक्रमाला माजी कुलगुरू जी.व्ही. पाटील, आयआयएलचे संचालक डी.टी. इंगोले, रवींद्र सरोदे यांच्यासह शहरातील विविध शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.रशियाच्या नृत्यांगणाने वेधले लक्षरशियाच्या सुप्रसिद्ध ओडिसी नृत्यांगणा सोफया कुखारीनोक यांनी सोलो प्रकारात उत्कृष्ट ओडिसी नृत्य सादर करुन सर्वांना मंत्रमुग्ध केले.