शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
2
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
3
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
4
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
5
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
6
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
7
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
8
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
9
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
10
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
11
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
12
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
13
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
14
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
15
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
16
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
17
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
18
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
19
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
20
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन

जगात सर्वाधिक वाघ भारतात, मेळघाट व्याघ्र प्रकल्प पहिल्या नऊमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:12 IST

इंदिराजींची दूरदृष्टी : १९७३ मध्ये व्याघ्र अभयारण्याची संकल्पना अनिल कडू परतवाडा : जगातील एकूण वाघांपैकी ८० टक्के वाघ एकट्या ...

इंदिराजींची दूरदृष्टी : १९७३ मध्ये व्याघ्र अभयारण्याची संकल्पना

अनिल कडू

परतवाडा : जगातील एकूण वाघांपैकी ८० टक्के वाघ एकट्या भारतात आहेत. भारत जगात सर्वाधिक वाघ असलेला देश ठरला आहे.

सन २००६ मध्ये देशात १४११ वाघ होते. सन २०१० मध्ये १७०० वाघ होते. टायगर एस्टिमेशन रिपोर्टनुसार सन २०१४ मध्ये भारतात २२२६ वाघ होते. त्यात लक्षणीय वाढ झाली असून, सन २०१८ मध्येही वाघांची संख्या २९६७ झाली आहे. जागतिक स्तरावर ही नोंद सर्वाधिक ठरली आहे.

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सन १९७३ मध्ये सर्वप्रथम देशात व्याघ्र अभयारण्य ही संकल्पना अस्तित्वात आणली. देशात पहिले नऊ व्याघ्र अभयारण्य घोषित केले. यात मेळघाट व्याघ्र अभयारण्याचा समावेश केला गेला. राज्यातील हा पहिला व्याघ्र प्रकल्प आहे. वाघांच्या संरक्षण, संवर्धनात मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे योगदान देशपातळीवर उल्लेखनीय असून, देशातील टॉप टेनमधील एक व्याघ्र प्रकल्प म्हणून मेळघाटची ओळख आहे. जागतिक व्याघ्र दिनी २९ जुलै रोजी जागतिक स्तरावर देशासह या व्याघ्र प्रकल्पाचा आवर्जून उल्लेख केला जातो.

देशातील मोठा व्याघ्र प्रकल्प

वाघांचा सर्वोत्कृष्ट नैसर्गिक अधिवास ठरलेला मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्रफळाच्या अनुषंगाने देशातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रफळ २७०० चौरस किलोमीटर असून, ३६१.२८ चौरस किलोमीटरचे गुगामल राष्ट्रीय उद्यान त्यात समाविष्ट आहे.

शंभर वाघांची क्षमता

शंभरहून अधिक वाघांचा सांभाळ करण्याची मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची क्षमता आहे. एका वाघाला साधारणतः २५ चौरस किलोमीटरचे क्षेत्र लागते. सद्यस्थितीत मेळघाट व्याघ्र प्रकल्पात ५० वाघ आहेत. यात २१ मादी आणि २९ नर असा समावेश आहे. याव्यतिरिक्त वाघांचे २२ छावे आहेत. वाघांचे छावे विचारात घेतल्यास मेळघाट व्याघ्र प्रकल्पात एकूण ७२ वाघ सध्या वास्तव्यास आहेत.

क्राईम सायबर सेल

मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत वाइल्ड लाईफ क्राईम सायबर सेल २०१३ मध्ये स्थापन केला गेला. देशातील हा पहिला सायबर सेल. देशांतर्गत जवळपास अडीचशे शिकाऱ्यांना, चोरट्यांना या सेलने पकडून दिले आहे. मागणीनुसार त्या त्या राज्याला हा सायबर सेल आपली सेवा देतो. मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत चोरट्या शिकाऱ्यांवर या सायबर सेलने आपला वचक निर्माण केला आहे.

दि.28/7/21 फोटो