बीडीडीएसकडून तपासणी सुरू : इसिसच्या धमकीनंतर अलर्ट बडनेरा / अमरावती : दहशतवादी हल्यांच्या धमकीमुळे शहर पोलीस विभाग अलर्ट झाला आहे. स्वातंत्र दिनाच्या पर्वावर शहरातील चौका-चौकात पोलिसांचा खडा पहारा राहणार आहे. बिडीडीएस पथकाद्वारे शहरातील गर्दींची ठिकाणी व शासकीय कार्यालयांची तपासणी केली जात आहे. इसिस या दहशतवादी संघटनेने दिलेल्या बॉम्ब स्फोटाच्या धमकीनंतर राज्यभरात अलर्ट जारी झाला. रेल्वे स्थानकासह गर्दीच्या अन्य सर्व ठिकाणांच्या सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली. रविवारी बॉम्ब शोधक व नाशक पथकाचे पोलीस निरीक्षक प्रदिप परदेशी यांच्या नेत्तृत्वात पोलीस कर्मचारी रविद्र दलाल, भरत, मोहन, अनिल, अमर, अजय, गणेश, संतोष, मुकेश यांच्यासह श्वान प्रीन्स व तेजा यांनी विभागीय आयुक्त कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय, मॉडेल रेल्वे स्थानक, बसस्थानक, मोठे मॉल, अंबादेवी एकविरा देवी मंदिरासह महत्वाच्या ठिकाणांची तपासणी केली. या व्यतिरिक्त शहरातील हॉटेल लॉजीगमधील नागरिकांची चौकशी करण्यात आली. तसेच शहरातील अंतर्गत परिसरात सुध्दा पोलिसांनी गस्त वाढविली आहे. स्वातंत्र दिनी तर चौका-चौकात पोलिसांचा खडा पहारा राहणार आहे. शहरातील दहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुमारे १५०० पोलीस स्वातंत्र दिनी तैनात राहणार आहेत. पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त व पोलीस निरीक्षकांसह पोलीस कर्मचारी शहराच्या सुरक्षेसाठी तैनात राहणार आहे.बडनेरा रेल्वे स्थानकावर रुट मार्च अमरावती व बडनेरा रेल्वे स्थानकावरील सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी रविवारी पोलिसांनी रुट मार्च काढला. रेल्वे पोलीस व रेल्वे सुरक्षा बलाकडून रेल्वे प्लॅटफार्मवरील सुरक्षेसंबधीत तपासणी व चौकशी करण्यात आली. प्रवाशी रेल्वे गाडीमधील संशयीत नागरिकांची पोलिसांनी चौकशी केली. जड वाहतुकीस प्रवेश बंदी बडनेरा / अमरावती : शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत स्वांतत्र्यदिनी जड वाहनांना वाहतुकीस प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. शहरात येणाऱ्या सर्व मार्गावर पोलीस चौकस नजर ठेवून राहणार आहेत. शहरातील काही चौकांमध्ये नाकाबंदी लावून वाहतूक नियंत्रित केली जाणार आहे. फिक्स पार्इंटवरून जाणाऱ्या वाहनांकडे पोलिसांनी विशेष नजर राहणार आहे. त्यामुळे जड वाहन धारकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.सहा जणांचा आत्मदहनाचा इशारा विविध प्रलंबित मागण्यांसाठी उर्मिला जैन (रा. मांजरी म्हसला, नांदगाव खंडेश्वर), भारत विश्वनाथ हरणे (रा. बिच्छु टेकडी), ए.डब्ल्यू.ठवरे (रा. रहाटगाव), मोहन संपत आठवले (रा. महाजनपुरा), गजानन दामन साठे (रा. खेडपिंपरी, नांदगाव खंडेश्वर) यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. यामुळे पोलिसांवर अतिरिक्त ताण आला असून पोलीस आत्मदहनाचा इशारा देणाऱ्यांचा शोध घेत आहेत. स्वातंत्र्यदिनाला गालबोट लागू नये, यासाठी कडक बंदोबस्त
स्वातंत्र्यदिनी पोलिसांचा खडा पहारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2016 23:55 IST