शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

बडनेऱ्यात डेंग्यूरुग्णांच्या संख्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 22:18 IST

बडनेरा : डेंग्यूने बडनेरात कहर केला आहे. गत पंधरवड्यात ३३ वर्षाच्या युवकाचा मृत्यू झाला. डेंग्यूरुग्णांमध्ये मोठ्या संख्येने वाढ होत आहे. डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मनपा प्रशासनाकडून काहीच उपाय होत नसल्याचे चित्र आहे.कात्रे टाऊनशिपमध्ये राहणारी १३ वर्षांची सिद्धी सोमेश्वर मोरे ही युवती डेंग्यू पॉझिटिव्ह आहे. ती अमरावतीत एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार ...

ठळक मुद्देसाथीचे आजार वाढले : खासगी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची गर्दी

बडनेरा : डेंग्यूने बडनेरात कहर केला आहे. गत पंधरवड्यात ३३ वर्षाच्या युवकाचा मृत्यू झाला. डेंग्यूरुग्णांमध्ये मोठ्या संख्येने वाढ होत आहे. डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मनपा प्रशासनाकडून काहीच उपाय होत नसल्याचे चित्र आहे.कात्रे टाऊनशिपमध्ये राहणारी १३ वर्षांची सिद्धी सोमेश्वर मोरे ही युवती डेंग्यू पॉझिटिव्ह आहे. ती अमरावतीत एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. याच परिसरातील सीमा यादगीरे ही २० वर्षांची तरुणीदेखील डेंग्यूने ग्रस्त आहे. माळीपुरा परिसरातील एकलव्य पराले, तुषार वऱ्हेकर, अभिमन्यू डहाके यांनादेखील डेंग्यू या आजाराने घेरले आहे. बडनेऱ्यात डेंग्यूरुग्णांची संख्या वाढतच आहे. त्याचप्रमाणे साथीच्या आजारानेदेखील रुग्ण त्रस्त आहेत. खासगी हॉस्पिटलमध्ये प्रचंड गर्दी आहे. जुनी वस्ती परिसरात स्वच्छतेबाबत प्रशासन काळजी घेत नसल्याने साथरोग बळावले आहेत, अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.डेंग्यू पॉझिटिव्ह असलेली माझी मुलगी अमरावतीच्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. बडनेरा शहरात डेंग्यूरुग्ण मोठ्या संख्येत आहे. आमच्या भागात स्वच्छतेवर भर द्यावा. डासांचा नायनाट करण्यासाठी उपाययोजना कराव्यात.- जयश्री मोरेमाजी नगरसेविका