शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी सेविकांना मोबाईलचा वाढीव भत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:13 IST

अमरावती : अंगणवाडी सेविकांना आता या महिन्यापासून ४०० ऐवजी ६०० रुपये मोबाईल भत्ता मिळणार आहे. कॉलिंग व इंटरनेट ...

अमरावती : अंगणवाडी सेविकांना आता या महिन्यापासून ४०० ऐवजी ६०० रुपये मोबाईल भत्ता मिळणार आहे. कॉलिंग व इंटरनेट पॅकच्या दरात वाढ झाल्याने महागाईची झळ कमी करण्याच्या उद्देशाने राज्याच्या महिला व बालविकास विभागाने हा निर्णय घेतला आहे. याचा लाभ जिल्ह्यातील २,६४४ अंगणवाडी सेविकांना होणार आहे. यासाठी १६ लाख ५६ हजार रुपयांची रक्कम संबंधिताच्या बॅक खात्यावर जमा केली जाणार आहे.

अंगणवाडी सेविकांचे ऑनलाइन कामकाज करणे सोयीचे व्हावे म्हणून राज्य शासनाकडून मोफत मोबाईल देण्यात आले. त्यावर कॉलिंग व इंटरनेटसाठी ४०० रुपयेदेखील देण्यास सुरुवात झाली . दर तीन महिन्यातून एकदा याप्रमाणे ही रक्कम महिन्याच्या सुरुवातीला संबंधित अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, पोषण समन्वयकांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे. गत काही महिन्यांपासून इंटरनेटच्या पॅकची किंमत वाढल्याने दिल्या जाणाऱ्या रक्कमेत वाढ करावी, अशी मागणी होत होती. या मागणीची दखल घेत महिला व बालकल्याण विभागाने २०० रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात २६४४ अंगणवाडी सेविका,१०१ पर्यवेक्षक आणि १५ तालुका समन्वयक आदींना मार्च ते मे या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी प्रत्येकी ६०० रुपयाप्रमाणे १६ लाख ५६ हजार रुपये मिळणार आहेत.

बॉक्स

या कामासाठी मोबाईलचा वापर

मोबाईलच्या माध्यमातून रोजचा आहार, बालकांची निरीक्षणे स्वाध्याय, हजेरी रजिस्टर भरणे आदी कामे केली जातात. अंगणवाडीशी संबंधित कामकाज मोबाईलच्या माध्यमातून बऱ्यापैकी ऑनलाईन होते. सध्या अंगणवाडी बंद असल्या तरी देखील इतर कामांच्या नोंदी तेथे बसूनच काही क्षणात जिल्हा परिषदेतील महिला बालकल्याण विभागात पोहचतात. मोबाईलने काम सुलभ करणे सोयीचे होणार आहे.

कोट

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांचा भत्ता महिन्याच्या सुरुवातीला दिला जातो. या वेळी वाढीव भत्ता देण्यात येणार आहे. याकरिता शासनाकडून निधी मंजूर झाला आहे.सदर रक्कम लवकरच संबंधितांचे खात्यात जमा केली जाईल.

- प्रशांत थोरात,

उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालविकास