शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाकाळात वाढले गर्भपात....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:13 IST

अमरावती : काही क्रिटिकल परिस्थीमुळे गर्भवती मातेचे गर्भपात करणे आवश्यक असते. त्याला शासनमान्यता असल्याने सन २०१९ मध्ये २१३ गर्भपात ...

अमरावती : काही क्रिटिकल परिस्थीमुळे गर्भवती मातेचे गर्भपात करणे आवश्यक असते. त्याला शासनमान्यता असल्याने सन २०१९ मध्ये २१३ गर्भपात करण्यात आले होते. मात्र, कोरोनाकाळात सन २०२० मध्ये तब्बल ३६३ गर्भपात झाल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून पुढे आले आहे.कोरोनाकाळात अनेकांचा रोजगार गेला. आर्थि. चणचणीमुळे दवाखान्यात योग्य औषधोपचार घेणे शक्य झाले नाही. खानपानाची योग्य व्यवस्था होऊ शकली नाही. अशा अनेक कारणांमुळे बाळाच्या पोषकतेत उणीव निर्माण झाल्याने गर्भातच बाळांना व्यंगत्व आल्याचे सोनोग्राफीअंती निदान झाले. परिणामी ते जन्मदात्री आईसाठी धोक्याचे ठरल्याने ‌वा अन्य कारणांमुळे गर्भपात करावे लागले. अशा २१३ घटना मार्च २०१९ ते एप्रिल २०२० दरम्यान घडल्या आहेत. तसेच मार्च २० ते एप्रिल २०२१ दरम्यान ३६३ गर्भपाताच्या घटना घडल्या असून, एप्रिल ते जून २०२१ दरम्यान अवघ्या तीन महिन्यात ७८ मातांचे गर्भपात करावे लागल्याचे वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे. ही आकडेवारी केवळ शासकीय रुग्णालयातील असून याव्यतिरिक्त खासगी रुग्णालयात व डॉ. पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज तथा रुग्णालयातील आकडेवारी उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे कोरोनाकाळात केवळ आर्थिकच अडचण नव्हे तर आरोग्यविषयक अडचणींचाही अनेकांना सामना करावा लागल्याचे स्पष्ट होत आहे.

गर्भपाताची आकडेवारी

जिल्हा स्त्री रुग्णालय -

सन २०१९ - २१३

सन २०२० - ३६३

सन २०२१ - ७८

पीडीएमसी

सन २०१९ - १६६

सन २०२० - १२८

सन २०२१ - --

बॉक्स

गर्भ असताना कोरोना झाला तर

महिलेच्या पोटात गर्भ असताना कोरोना झालाच तर त्याचा गर्भावर काही परिणाम झाल्याची आतापर्यंत अशी कुठे नोंद नाही. तसेच आता गर्भवती मातेला व्हॅसिनेशनची परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे लस घेतल्यानंतर गर्भवती मातांनी घाबरण्याचे कारण नाही. मात्र, काळजी घेणे गरजेचे आहे, अशी माहिती डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अनिल देशमुख यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

कोट

कोरोनाकाळात गर्भवती महिलांनी विशेष काळजी घेतलेली आहे. त्यामुळे नाहकच गर्भपात करण्याची वेळ आली नाही. मात्र, व्यंगत्व असलेलेच गर्भपात करण्यात आले. एप्रिल ते जून दरम्यान डफरीनमध्ये १० गर्भपात केल्या गेले.

- विद्या वाठोडकर, अधीक्षक, जिल्हा स्त्री रुग्णालय