अमरावती : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शहर राज्यातील टॉप टेन शहरामध्ये सध्या आहे. हा एक प्रकारचा अलर्ट आहे. जिल्ह्यात ३३८ दिवसांत ४१ हजारांवर कोरोनाग्रस्तांची नोंद झाली. यात सर्वाधिक २५ हजारांवर रुग्णसंख्या अमरावती महानगरातील आहे. शहरातील प्रत्येक १०० नागरिकांमधील तीनपेक्षा अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची धक्कादायक माहिती आहे.
शहरातच नव्हे तर जिल्ह्यातील पहिल्या कोरोनाग्रस्तांची नोंद ४ एप्रिल २०२० मध्ये महापालिका क्षेत्रात झाली. तेव्हापासून सातत्याने रुग्णसंख्येत वाढ होत आहे. यात सप्टेंबर २०२० व फेब्रुवारी २०२१ या महिन्यात कोरोनाचा ब्लास्ट शहरात झाला. आता तर कुटुंबचे कुटुंब संक्रमित होत आहेत. शहरात आतापर्यंत १०,७७५ रुग्णांनी ‘होम आयसोलेशनची’ सुविधा घेतल्याने आरोग्य यंत्रणेवरचा ताण काहीसा कमी झाला. मात्र, या रुग्णांनी नियमांचे पालन न केल्यामुळे संक्रमणात वाढ झाली, हेदेखील तेवढेच खरे.
शहरात पहिल्या रुग्णाची नोंद झाल्यानंतरचे चार महिने सातत्याने सर्वेक्षण, आशांच्या गृहभेटी, हॉट स्पॉटमध्ये स्वॅब सेंटर, कंटेनमेंट झोन व आयुक्त प्रशांत रोडे यांचे सूक्ष्म नियोजन यामुळे हॉट स्पाॅटमध्ये कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात महापालिका प्रशासनाला यश आले. मात्र, त्यानंतर शहराच्या इतर भागातही कोरोनाचे संक्रमण सुरू झाल्यावर पुन्हा रुग्णसंख्या वाढीस लागली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या सोबतीला नागरिकांच्या सामूहिक प्रयत्नाची जोड आवश्यक आहे.
बॉक्स
परिस्थिती नियंत्रणात, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
संक्रमणाच्या प्रमाणासाठी प्रशासनाद्वारा एक मिलियन व त्याच्या तुलनेत पॉझिटिव्ह असे प्रमाण काढले जाते व यानुसार नागपूर, पुणे, सांगली, नवी मुंबई, नाशिक, अहमदनगरनंतर अमरावती शहराचा क्रमांक आहे. राज्यातील टॉप टेन संक्रमित शहरांमध्ये अमरावतीचा समावेश असला तरी परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. महापालिका प्रशासन चांगले काम करीत असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.
बॉक्स
‘त्या’ रुग्णांवर कारवाई करा, विभागीय आयुक्तांचे निर्देश
महापालिका क्षेत्रात होम आयसोलेशनमधील काही रुग्णांद्वारा नियमांचे उल्लंघन होत असल्यामुळे कारवाईचे निर्देश विभागीय आयुक्त पीयीष सिंह यांनी दिले आहेत. त्यानुसार महापालिकेच्या पथकांना आयुक्त प्रशांत रोडे यांनी निर्देशित केले आहे. आता पथकांद्वारा या रुग्णांची नियमित चौकशी व त्यांच्या घरांना भेटी दिल्या जात आहे. या चार दिवसांत सहा रुग्णांवर कारवाई करून दीड लाखांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे.
कोट
ग्रामीणच्या तुलनेत अमरावती शहरात सर्वाधीक रुग्ण आहे. शहराचा संक्रमन दर राज्याच्या टॉप टेन शहरांमध्ये आहे. जिल्हा व महापालिका प्रशासन आवश्यक ती सर्व खबरदारी घेत आहे. पथकांद्वारा कारवाया सुरू आहेत. नागरिकांनी त्रिसूत्रीचे पालन करावे.
- शैलेश नवाल,
जिल्हाधिकारी
कोट
होम आयसोलेशनमधील रुग्णांवर दंडात्मक कारवाया सुरू आहे. कॉन्टीक्ट ट्रेसिंग वाढविण्यात येऊन अधिकाधिक चाचण्यांवर भर दिला जात आहे. नागरिकांनीदेखील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह त्रिसूत्रीचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.
- प्रशांत रोडे,
आयुक्त, महापालिका
पाईंटर
कोरोना जिल्हास्थिती : ०००००
जिल्ह्यात कोरोनाग्रस्त : ०००००
शहरामध्ये संक्रमित : ०००००
आतपर्यत मृत्यू : ०००००
एकूण डिस्चार्ज : ०००००